Thursday, July 1, 2010

गृहसोसायटीच्या सभांना हजेरीची सक़्ती अयोग्य

वार्षिक सभांना गैरहजर राहणा-या सदश्यांना दंड आकारण्याचा निर्णय  म्हणजे जास्त   असहकार माजविणे आहे.सोसायटीच्या सामुदायिक कामामघ्ये सहभाग घेण्याची जबरदस्ती करणे कितपत योग्य आहे.आयुक्तानी चागंल्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.पण या निर्णयाचा त्रास सोसायटीच्या कमिट्यांना होणार आहे.प्रत्येक सोसायटीत अगोदर दोन तीन ग्रुप असतात. त्यामघ्ये वाद विवाद व भाडंणे असताना बळजबरीने सर्व सदश्याना सभांना हजेरी लावण्यात भाग पाडल्यास आणखी वाद व गोधंळ वाढल्याने कमिटीला निर्णय घेण्यास विलंब होईल.प्रत्येक सदश्य आपले ह्क्क वापरुन आपले मत माडंत लवकर न मिटणारे वाद निर्माण होतील. अशा मतमतांतरापासून सोसाय़टीतचे हित न जपता स्वहित जपले जाईल.सामुदायिक निर्णयप्रक्रिया लाबंत गेल्यास सोसायटीची कामे होणार कशी? कमिटीवर निवडुन दिलेल्या सदश्यांवर इतर सदश्यांनी टाकलेल्या पाठिब्यांवर व विश्वासावर सोसाय़टीचा कारभार सुरळीत होताना दिसतो. तेव्हा उपस्थितीच्या सक्तीला एवढे महत्व देउन दंड करणे अयोग्य आहे.सर्व सदश्याना सोसायटीच्या संभाना हजर राहणे बधंनकारक नसावे.


हि प्रतिक्रिया आजच्या 'महाराष्ट्र टाइम्स' या वृतपत्रात प्रसिद्ध झली आहे.

No comments: