काल पेण-खोपोली रस्त्यावरील एका रिसोर्टवर मित्रासह गेले होतो.हिरव्या गर्द झाडीत लपलेला हा रिसोर्ट आहे.खुपश्या औषधी वनस्पती लावलेल्या आहेत.छोटासा तरणतलाव आहे.सगळे मित्र तरणतलावात मजा करीत होतो. तरणतलावाच्या बाजुला कुंपणावर वेल दिसली त्यावर निळ्या रंगाची सुदंर फुले फुललेली दिसली. या प्रकारची फुले मी प्रथमच पाहत होतो.माझ्या मित्रानी या फुलांचे नांव 'कृष्ण कमळ'आहे अशी माहीती दिली.फुलांच्या पाकळ्या व आतिल भागाची ठेवण आकर्षक आहे.ह्या फूलाला हे नाव कुणी दिले माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारखे कमळ किंवा कमळातला कृष्ण.
कृष्ण म्हणून तो निळा.ह्या फुलाचा रंग ही निळा. कृष्णासारखा. कमळ, ते ही निळं!हा निळा म्हणजे आकाशी निळा नाही तर गडद, काळपट निळा.जांभळाच म्हणा हव तर. कृष्णप्रिय मोरपिसामधे एक जांभळी छटा असते तशी छटा.
कृष्ण म्हणून तो निळा.ह्या फुलाचा रंग ही निळा. कृष्णासारखा. कमळ, ते ही निळं!हा निळा म्हणजे आकाशी निळा नाही तर गडद, काळपट निळा.जांभळाच म्हणा हव तर. कृष्णप्रिय मोरपिसामधे एक जांभळी छटा असते तशी छटा.
मधला कृष्ण आणि बाजूने गोल फेर धरलेल्या त्या शेकडो गोपिका.मोरपिसाला जसे धागे,रेषा-रेषा असतात अगदी तश्याच या निळ्या कमळाच्या पाकळाच्या आत बारिक लांब पाकळ्या दिसतात.कमळाच हिरव देठ फूलासारखच नाजूकस. आणि हे फूल `कमळ `असल तरी पाण्यातल नाही तर वेलीवरचं! जस गणपतीला जास्वंद, हनुमानाला रूई, देवीला वासाची फूले किंवा शिवाला बेल आणि दत्ताला तुळस वाहिली जाते, तस कृष्णाला हे कृष्णकमळ हेच फूल आवडत अस काही वाचण्यात आल नाही.रंग जितका आकर्षक तितकच याचा वास ही मोहक असतो. काहीसा मंद.अगदी जवळ जाऊन घेतला तर तरच येणारा. पण मनाला धुंद करणारा.पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा.सुगंधाने आपण आकर्षित होतो. हे फुल उशिरा व लवकर मावळते.ह्या फुलांमघील बदल मी पाहत होतो.आम्ही त्या फुलांचे फोटो काढले.मी त्या वेलीचा छोटासा भाग मागुन घेतला आणि आमच्या सोसाय़टीत लावला आहे.पाहुया आमच्या बागेत कृष्णकमळ उमलते का?

1 comment:
इकडे मालवीय बोलीत त्याला राखीचे फुल म्हणतात.
Post a Comment