Thursday, June 17, 2010

वडीलाचे नाते

माझ्या वडिलाना मी जवळून पाहत आहे.पण माझा मुलगा झाल्यावर मी बाबा झालो याचा अनुभव आला. तेव्हाच मी वडिल झालो माझ्या मुलाचा आणि त्याच्याशी वडिल नाते न ठेवता मित्राचे नाते जोडले. आपल्या घरात येणा-या तान्हुल्याच्या आगमनाची प्रतीक्षा करणा-या कुटुंबासाठी मुलाचा जन्म ही एक अमर्याद आनंद देणारी घटना असते. लहान मूल हे घरात आलेला केवळ एक नवा जीव नसतो तर त्याहूनही अधिक काही असतो. लहान मुलाच्या आगमनाबरोबर त्या कुटुंबात अनेक नवीन नाती रुजतात. आई-वडील , आजी-आजोबा , काका-काकू , आत्या , भाऊ-बहीण अशी अनेक नवी नाती रुजतात , वाढतात.त्याचबरोबर मुलगा-बाबा हेही नाते नकळत रुजले जाते. सभोवतालच्या नव्या जगात माझ्या मुलाचा प्रवेश होत असताना आपण त्याच्या सभोवताली असावं , अशी बापाची धडपड सुरु होते. मूल वाढताना बघणं हा अमूल्य आनंदाचा ठेवा असतो. त्याच्या बोबड्या बोलाने सगळेच आनंदून गेलो.
या लहान मुलाला उठून उभं राहताना,एकेक पाऊल पुढे टाकताना मोठ्या माणसांच्या आधाराची गरज लागते.त्याच्या सर्व मागण्या पुरवण्यासाठी त्याच्या अवतीभोवती सतत कोणी ना कोणी असतंच. आपल्या मुलाला सर्व काही मनासारखं मिळावं,सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वडील धडपडत असतो. आपल्या मुलानं चांगली मूल्य शिकावित असा वडिलांचा प्रयत्न असतो.


बाळाच्या जन्मामुळे आई-वडिलांच्या नात्यालाही एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं.या लहानग्या नातवंडाच्या बाळलीला सर्वाधिक मोहून टाकतात आजी-आजोबांना. त्यांना या बाळाच्या बरोबर खेळायला भरपूर वेळही असतो. अनेकदा असं दिसतं की , लहान मुलांना आपल्या मनातील गोष्टी आपल्या आजी-आजोबांकडे मोकळेपणे सांगता येतात.आईवडिलांना मुलाला खूप जास्त वेळ देणंही शक्य होत नाही.या लहान मुलांना आजोबा आजी आई बाबांपेक्षा जवळचे वाटतात.


मी मोठा होत आहे तसाच मुलगाही मोठा होत आहे आणि आजोबा आजी वयस्कर होत आहेत.मी आता मुलांसह त्यांचीही काळजी घेत आहे.माझे आई-वडील जसे वयस्कर होत आहेत तसे लहान मुलासारखे होतात. त्यांची पावलं अडखळत असतात. त्यांना एक-एक पाऊल टाकण्यासाठी तुमच्या आधाराची गरज असते.याचवेळीच त्यांना माझी खरी गरज असते...गरज पुरवणे हे माझे कर्तव्य आहे.


आपल्याला आयुष्य देणा-या आई-वडिलांना कधीही विसरता कामा नये. आपल्या वृद्ध माता-पित्याला आदराने , प्रेमाने वागवलं पाहिजे. शक्य असेल त्या मार्गाने त्यांच्या प्रेमाची परतफेड केली पाहिजे. माझ्या बालपणी त्यांनी जसं माझे संगोपन प्रेमाने केला तसेच प्रेम मीही त्याच्यावर करतो.




काही लोकांनी वडील रेखाटले पण तेही तापट, व्यसनी, मारझोड करणारेच! समाजात एक-दोन टक्के असे वडील असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय?

सोशिक, कैवल्यमूर्ती आईच्या तुलनेत मानवी व पशू-पक्ष्यांच्या सर्वच संस्कृतींमध्ये मागच्या रांगेत स्थान मिळालेला बाप खरोखरच कठोर असतो का? मुलांच्या संगोपनात त्याचे स्थान नेहमीच दुय्यम असते का? आपल्या पिल्लांची काळजी वाहण्यात त्यांचे पाऊल एक घर मागे असते का?...

वडिलाने माझ्या वर प्रेम केले तसेच मला माझ्या वडिलानावर प्रेम केले पाहीजे आणि माझ्या मुलानी माझ्यावर प्रेम केले तरच मुलगा-वडिलांचे नाते जपले जाईल.

जूनचा तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा होतो. अमेरिकेत त्याला मदर्स डे इतकेच महत्त्व. पण भारतात कदाचित बापाचे प्रेम इतके उमजले आणि रूजलेही नाही.

1 comment:

Anonymous said...

gr8 article.

AA