त्यामुळे पत्र लिहिण्याचा प्रश्नच नाही.
पण, दहा वर्षांपूवीर्ची बात मात्र वेगळीच होती.
हृदयाला भिडलेल्या तिला पटवण्यासाठी गुलाबी पत्र लिहिण्याशिवाय पर्यायच नसायचा.
पूर्वी
थेट जाऊन प्रपोज करायचं, तर आपली फाटते. हो नाय काय म्हणायचं ते म्हणेल, पण भर रस्त्यात तिनं सुनावलं तर काय इज्जत राहिली? पण तिला भिडायला तर पाहीजेच. तिला बघताच जिवाचं पाणी पाणी होतंय. काय करू? पत्र लिहिण्याशिवाय पर्याय नाही.
प्रेमपत्र (इम्प्रेशनसाठी)
पत्रासाठी कागद कोणता वापरायचा साधे वहीतले पान, सुगंधी किंवा गुलाबी पाकळ्यांचा पेपर यापासुन सुरुवात.
पत्र कोणत्या पेनाने लिहायचे बाँलपेन,इंकपेन की कलरपेन?
कोणाला विचारेल तर गावंभर बोबाबोंब होईल ही भीती आणि तीलाही कळेल.
पत्र व पेन ठरले की अक्षर कसे असावे.दुस-या कोणाला लिहीण्यास सांगणे म्हणजे मोठा गुन्हा.
पत्राची सुरुवात 'प्रिय'. मजकूरात तिची सौंदर्याची स्तुती आणखी थोड्याशा
काँमन आणाभाका
"मला तुझी साथ हवी आहे. कायमची. मी हात पुढे केलाय, तू प्रतिसाद देशील, अशी अपेक्षा आहे. फक्त एकदा विश्वास ठेव. जास्त काही लिहीत नाही. पण खूप अपेक्षा आहे. तू होकार देशील. तू नाही म्हणालीस तर माझं आयुष्य निरस होऊन जाईल. काहीच अर्थ उरणार नाही. तुझ्या उत्तराची वाट बघतोय."
शेवट 'फक्त तुझाच', 'तुझाच' हा शब्द मस्टच. म्हणजे तुझ्याशिवाय दुस-या कोणाचा होऊ शकत नाही,होणार नाही.
शेवटी पत्र पोहचवायचे कसे? स्वत: भेटुन की दुस-याच्या हाती?
उत्तराची वाट पाहत बसायचे.
हे प्रयत्न कीती मागासलेले होते.
आता मोबाईलचा जमाना.सारखे हातात असलेले खेळणे.
पत्र लिहीण्याचा एवढा खाटाटोप कशाला?
एसएमएस पाठवला की त्याचे लगेच उत्तर.
मजकूरही पूर्ण वाक्यात लिहायचा त्रास नाही.शॉर्टकर्ट असतातच.
उत्तरही दोन किंवा एकच अक्षर 'Y' / 'No'.
उत्तर ' Y ' असल्यास प्रेमाला सुरुवात नव्या एसएमएसनी.
उत्तर ' No ' असल्यास दुस-या मोबाईल ( नवीन नबंरवर ) तोच एसएमएस फाँवर्ड करायचा.
उत्तर ' Y ' येत नाही तोपर्यत.
एवढे सोपे झाले आहे मोबाईलवर प्रेमपत्र लिहीणे.
आता या ही पुढे फक्त एक व्हिडीयो काँल पाठवुन फोनवर ('लव्ह अँट र्फस्ट साइट') प्रपोज करायचा जमाना आहे.कीती जमाना फास्ट आणि इनस्टन्ट झाला आहे.थांबायला,विचार करायला वेळ नाही.
2 comments:
तुमचे लिखाण खरच छान आहे. आणि लेख प्रेमिकांसाठी आपला वाटणारा असाच वाटतो.
खरच वरदान आहे हे...
Post a Comment