Friday, June 11, 2010

अस्तित्व नसावे हे खेदजनक

  आजपासून आफ्रिकन भूमीवर प्रथमच फुटबॉल वर्ल्डकप रंगणार असल्याने संपूर्ण देशात एखाद्या सणासारखा माहोल आहे.फुटबॉलची जागतिक लोकप्रियता लक्षात घेता टीव्ही प्रक्षेपणावरही कोट्यावधी डोळे लागले आहेत.तब्बल महिनाभर फुटबॉलप्रेमींच्या मनावर गारूड करणा-या या 'फुटबॉल फीवर'ची सुरुवात होईल ती यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध मेक्सिको या सामन्याने. फुटबॉलमधील अव्वल ३२ संघ वर्ल्डकपवर आपले नाव कोरण्यासाठी झुंजतील.फुटबॉलमधील अव्वल ३२ संघ वर्ल्डकपवर आपले नाव कोरण्यासाठी झुंजतील.त्यामघ्ये भारत ह्या देशाचे नांव केव्हा दिसेल?
फुटबॉलप्रमाणे हॉकीही जेमतेम दोन तास रंगणारा, फुटबॉलच्या जवळ जाणारा खेळ. रग्बीही असाच लवकर आटोपणारा. पण फुटबॉलने प्रेक्षकांना लावलेले वेड आगळेच. या खेळाने सर्व थरातील क्रिडारसिकाना वेड लावले आहे.अनिश्चितता हे या स्पधेर्चे वेगळेपण आहे म्हणूनच इतके प्रेक्षक स्पधेर्कडे खेचले जातात.त्यामुळे ही स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात.फुटबॉल वाढण्यामागे, रुजण्यामागे कदाचित या खेळातील सुटसुटीतपणा हे कारण असावे.रोनाल्डो, कॅसिला, ड्रोग्बा, एटो, ल्युसियो, ऑन्दी, जेराल्ड, रुनी असे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडूना बघणा-या कोट्यवधींचा श्वास रोखला जातो. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या स्पधेर्त कोण जिंकणार हे सांगणे अवघड आहे.
आपल्या देशाने काही खेळात प्राविण्य मिळविले पण फुटबाँल या खेळात आपण प्रभाव पाडु शकलो नाही हे आपले दुदैर्व. यामागची कारणे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही.वर्ल्डकप आला कि आपण या जागतिक स्पर्धेत कोठेच दिसत नाही याचे वाईट वाटते. जगातले अनेक छोटे,आथिर्क स्थिती दयनीय असणारे देश या खेळात आहेत व वाहवाह मिळवित आहेत पण आपला तरुणांच्या देशाचे या स्पर्धेत कोठेच अस्तित्व दिसत नाही ही मोठी खेदजनक गोष्ट आहे. तरुणांनी हे आव्हान स्विकारले पाहीजे आणि सरकारने पुढच्या पांच वर्षात आपला देश या स्पर्धेत दिसण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपला देश जगातील सर्व आघाड्यांवर पुढे आहे.मग जगात जास्तीत जास्त देश खेळ्णा-या या खेळात मागे का?


No comments: