Friday, May 28, 2010

गरीबीचे प्रदर्शन करणे बंद करावे.

  जगाला मुबंईतील 'स्लमडाँग मिलिनिओर' या चित्रपटामुळे धारावीच्या झोपडपट्टीची माहिती झाल्यापासून परदेशी राजदुत व मंत्रीमहोदय आर्वजुन या पर्यटनस्थळाला भेट देउ लागले आहेत.मुबंईचे वैभव न पाहता मुबंई भेटीत  घारावीची झोपडपट्टी पाहिली कि भेटीचे फलीत झाल्यासारखे या पाहुण्यांना का वाटते? यासाठीच सरकारने धारावी हे ठीकाण पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याची गरज वाटत आहे.आपल्या राजकीय नेत्यांपेक्षा जास्त  परदेशी पाहुणे धारवीला भेट आहोत.धारावीचा गलिच्छपणा दुर न करता तो परदेशी मडंळीना दाखविण्यास सरकारच पुढाकार घेऊन आपणच आपली चेष्टा करीत आहोत.मुबंईच्या भेटीवर आलेल्या परदेशी पाहुण्याना ही अडगळ मुद्दामच दाखवून आपली असमर्थतता आपणच सिध्द करत आहोत.आपले गलिच्छपणाचे प्रदर्शन आपण या परदेशी  पर्यटकांसमोर कशासाठी करीत आहोत? त्यांच्याकडुन मदतीची अपेक्षा ठेवुनच आपले दारीद्र्य त्याना दाखवण्यात येते का? मुबंईला जागतिक दर्जाचे शहर बनविताना शहरातील ह्या गरीबीचे प्रदर्शन करणे बंद करावे व या भागाच्या चित्रणावर बंदी घालावी.


============================================================
SUMMARY OF SLUM TOURS


SHORT TOUR LONG TOUR PRIVATE LONG TOUR SLUM AND SIGHTSEEING TOUR
walking tour of Dharavi walking tour of Dharavi walking tour of Dharavi walking tour of Dharavi
see red light area & Dhobi Ghat (open air laundry) see red light area & Dhobi Ghat (open air laundry) see red light area & Dhobi Ghat (open air laundry)
traditional sightseeing in afternoon
travel by train or meet at Dharavi travel by a/c car travel by a/c car travel by a/c car
duration = 2.5hrs duration = 4.5hrs (including travel) duration = 4.5hrs (including travel) duration = 9hrs (including travel)
morning or afternoon start time morning start time (afternoon if enough people) morning or afternoon start time, with hotel pick up & drop flexible morning start time with hotel pick up & drop
meeting point at Churchgate or Mahim railway station meeting point at our office in Colaba pick up and drop from your hotel/residence pick up and drop from your hotel/residence
tour flexible to your requirements tour flexible to your requirements
Rs 400pp (US$ 10) Rs 800pp (US$ 20) Rs 3,200 (US$80) total for up to 5 people* Rs 5,400 (US$130) total for up to 5 people*
CLICK HERE TO BOOK SHORT TOUR CLICK HERE TO BOOK LONG TOUR CLICK HERE TO BOOK PRIVATE LONG TOUR CLICK HERE TO BOOK SLUM AND S/SEEING TOUR
=========================================================================
' http://www.realitytoursandtravel.com/slumtours.html '

या साईटवरुन अशा जाहीराती प्रसिध्द करुन लोक पैसा कमवित आहेत.व आपल्या देशातील गरीबीचे प्रदर्शन केले जात आहे.यावर सरकारने बंदी घालावी.



ही प्रतिक्रीया 'लोकमत' या वृतपत्रात रोजी दि.२९ मे,२०१० ला प्रसिध्द झाली आहे.

1 comment:

Mahendra said...

मी पण यावर एकदा लिहिलंय पुर्वी कधीतरी. मी स्वतः त्या फिरंगी लोकांना धारावीत पाहिलंय- आणि खूप संताप आला होता.
लोकं पैशाकरता काहीही करू शकतात! मुद्दाल त्या डंपिंग यार्डावर ( सायन - ते कुर्ला मधल्या ) पण लोकांना नेउन आणतात. हे थांबवायलाच हवं कसंही करुन... मनसेच्या/शिवसेनेच्या साईटला लिहितो यावर