Friday, May 28, 2010

वळवळणाचा रस्ता

   डोगंरमाथ्यावर पोहचण्यास वळवळणाच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो.सरळ चढावाच्या रस्त्याने डोगंरमाथा गाठण्याचा प्रयत्न धोक़्याचा ठरु शकतो.तसेच जीवनातही आपले ध्येय गाठण्यासाठी वळवळ्णाचा मार्ग न वापरता मघल्या मार्गाचा अवलंब करणे धोक्याचे असते.आपल्या ध्येयाच्या जवळ लवकर जाण्यासाठी काहीजण मघला पण त्रासाचा मार्ग वापरतात व ध्येयापासून लांबच राहतात.शिखर गाठण्यासाठी सावधतेने व सुरक्षितेने प्रवास करणे म्हणजेच वळवळणाचा रस्ता.हा वळवळणाचा रस्ता धिम्या गतीने चढल्यास सुरक्षित असतो.  सोपा रस्ता हा वळवळणाचा रस्ताच असतो. काही वळणे धोकादायक असल्याने वळणांवर वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.प्रत्येक वळण हे एक ध्येयाकडे जाण्याची पायरी असते.अशाच पाय-या चढल्यास शिखर गाठणे सोपे जाते.काही जण ध्येयाकडे जाताना अन्य मार्गाचा अवलंब करतात व स्वत:चा फसतात आणि दुस-याही फसवितात.



आयुष्याचा प्रवास फारच कमी वेळा सरळसोप्या रस्त्यावरून चालू राहातो. ब-याचदा वळणे घेत-घेत खाचखळगे अनुभवतच जावे लागते. आयुष्यातील कडू-गोड अनुभवांना सामोरे जावे लागते.आयुष्यात कोणतेही संकट आले,तरी खचून न जाता त्यावर मात करण्याचा सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहिल्यास जीवनात यशस्वी होतो.
आधुनिक काळातील मानवी जीवन हे अतिशय धकाधकीचे,तणावयुक्त व गुंतागुंतीचे बनत चालले आहे.माणसाच्या जगण्याच्या,जीवन उपभोगण्याच्या,अर्थार्जनाच्या कल्पना झपाट्याने बदलत आहेत.वाढती जीवघेणी स्पर्धा,अस्थिर वातावरण,नैराश्य,वैफल्य,अपयश,आजारपण,प्रेमभंग,मानसिक पिळवणूक इ.कारणांची न संपणारी यादी जरी आत्महत्यांच्या घटनांमागे असली,तरी आशा-आकांक्षांच्या विस्फोटामुळे आपले समाजजीवन व वैयक्तिक जीवन एका धोकादायक वळणावर येऊन उभे राहिले आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही अनपेक्षित वळणे येतात पण त्याला समर्थपणे सामोरे गेल्यास तुम्ही यशस्वी व्हाल.



आयुष्यात येण्यारी धोक्याची वळणे व्यवस्थित पार पाडा.

No comments: