व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात व्हीटीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे तेव्हापासून मुबंईतल्या ह्या रेल्वेस्टेशनला छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावांने संबोधले जाउ लागले.
दहशतवादी ह्ल्ल्यानतंर तर हे स्टेशन जगाच्या ओळखीचे झाले.अतिरेक्याँनी ह्ल्ल्यासाठी हे स्टेशन का
निवडले असेल? मुबंईच्या रोजच्या व्यवहारात ह्या स्टेशनाला खुप महत्व आहे.हे स्टेशन बंद झाले म्हणजे मुबंई बंद झालीच समजा.लगेच सगळे व्यवहार ठप्प होतात. शाळा,काँलेज,मार्केट,आँफिस बंद होऊन रस्त्यावरची वाहतुकीला गर्दी होते. राजकारणी मुबंईचा बंदची घोषणा केल्यावर ते यशस्वी करण्यासाठी स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात असतात. ह्या स्टेशनातून देशाच्या कानाकोप-यात गाड्या सुटतात व येथे येतात. मुबंईतून कसारा, कर्जत व पनवेल पर्यत लोकल गाड्या दिवस रात्र पळत असतात. लाखो प्रवाशी रोज या स्टेशनाचा वापर करतात. देशातले सर्वात गर्दीचे हे स्टेशन असेल.पण येथे सर्व शिस्तीत सुरु असते.स्टेशन नेहमीच घावत असते.थाबंते तेव्हा ते बंद असते.हे एक प्रेक्षणिय स्थळ आहे.परदेशी पाहुणे नेहमीच या स्टेशनात फोटो काढताना दिसतात.
स्टेशन एक बिळ आहे.सकाळी सर्व मुंग्या (माणसे) मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि दिवसभरानतंर पुन्हा बिळात शिरतात.स्टेशनातील धावपळ पाहण्यासारखी आहे.मोटरमन व गार्ड आपापल्या गाड्या नेत व आणत असतात. प्रवाशी गाडयांचे इंडिकेटर पाहुन धावत असतात.नविन प्रवाशी इकडुन तिकडे पळत असतात. सकाळी मच्छीवाले मासळी घेऊन धावतात. थांबलेल्या गाडीत फेरीवाले फिरतात.महिला प्रवाशांची विषेश धावपळ असते.लगेज वाले सामान घेऊन गर्दीतुन वाट काढत पळत असतात. पाकीटमार व भुरटे चोर आपली शिकारे हेरत असतात. तिकिट चेकर बिना तिक़ीट प्रवाशी पकडण्य़ाचा प्रयत्न करीत असतात.डब्बेवाल्यांची धावपळ दिवसभर सुरु असते.सिनेमेवाले शुटींग करीत असतात.दहशतवादी हल्ल्यानंतर स्टेशनात बेवारस सामान सापडल्यास प्रवाशी धाबरुन जातात.

स्टेशनात फिरल्यास वेगवेगळे चेहरे पाहण्यास मिळतात.गाडी चुकलेला,तिकीट नसल्याने समोर तिकिट तपासनीस दिसल्यानतंरचा,बुटपाँलिशवाल्याचा,पाकिट व मोबाईल हरवलेला,उभा राहुन प्रवास केलेला,गाडीतून वादावादी करीत खाली उतरलेला,तिक़िट तपासनीस व पोलीसाचा शोधक चेहरा,ग्राहकाना पटवणारा फेरीवाला,भेटण्यास येणा-या व्यक्तीची वाट पाहणारा चेहरा,गाडीला उशीरा झाल्याने, स्टेशनातील गर्दी पाहुन बिथरलेला.
गाडीला एका मिनीटाचा उशीर झाला तर तोबा गर्दी होते.गाड्या काही काळासाठी बंद झाल्या तर स्टेशनात पाय ठेवायला जागा नसते.'पनवेल' पर्यत गाड्या धावू लागल्यापासून गर्दी वाढली आहे.
वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट होण्याचा मान मिळालेल्या सीएसटी स्टेशनचे वैभव टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असतात. राजवाड्यासारखं दिसणाऱ्या या आपल्या आवडत्या स्टेशनाला ' जागतिक सांस्कृतिक वारशा ' चा दर्जा मिळाला आहे.
' सीएसटी ' ही यलो बसाल्ट स्टोन , पांढरा पोरबंदर स्टोन , खांब-फरशांसाठी संगमरवर आणि आतमध्ये विटा , चुना , सीमेंट , लोखंड , खिडक्यांसाठीच्या रंगीत काचा अशा वस्तूंनी बनलेली निजीर्व इमारत आहे.
पण टीव्ही सीरियलपासून ते होम लोन आणि मोबाइल फोनपर्यंतच्या प्रकाशमान जाहिराती लोकांना पाहता येण्याचं उत्तम केंद ; किंवा एडस्पासून ते पोलिओपर्यंतचे रोग कसे टाळावेत यासाठी पोस्टरं लावण्याची जागा .
' जागतिक सांस्कृतिक वारसा ' ठरलेलं एक ' रेल्वे स्टेशन ' आपण उपभोगतो आहोत.सध्या सीएसटी रेल्वे स्टेशनच्या डागडुगीचे काम सध्या सुरू आहे. या इमारतीने आणि स्टेशनला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. पहिली ट्रेन याच ठिकाणाहून धावली आणि नव्या जमान्यातल्या जांभळ्या अत्याधुनिक ट्रेनही इथूनच सुटतात. रेल्वेतून प्रवास करणा-यांना रेल्वे, तिच्याशी संबंधित वस्तू आणि घटना या अत्यंत जवळच्या वाटतात. त्याशिवाय शहराच्या लाइफलाइनची सुरुवात आणि या शहराची ओळख असलेले हे स्टेशन पाहण्यासाठी देशविदेशातूनही अनेक प्रवासी येत असतात.
समोर एकही यंत्रणा दिसत नाही.तरी पण हे गर्दीचे स्टेशन व्यवस्थित कार्यरत असते.हे विषेश आहे.
एकदा तरी पाहीले पाहिजे हे जागते सीएसटी स्टेशन.

No comments:
Post a Comment