केंदीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाकिस्तान दौ-याचा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी कितपत उपयोग होईल याविषयी बहुसंख्य भारतीयांच्या मनात साशंकता असली आणि तेच खरे झाले आहे.पाकिस्तानबरोबर चर्चा आणि शांततेचे प्रयत्न कशासाठी करायचे असा सवाल कुणी केला तर त्यात काहीच गैर नाही.दौ-याला दहा दिवस पुर्ण होण्याच्या अगोदर पाकिस्ताननेही पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू भागालगतच्या सीमारेषेवर गोळीबार केला.हिंसाचाराने धगधगणा-या काश्मीर खो-यात बुधवारी अखेरीस लष्कर तैनात करण्यात आले. लष्कराच्या तुकड्यांनी लाल चौक, श्रीनगर विमानतळ तसेच खो-यातील अनेक ठिकाणी ध्वजसंचलन केले.
काश्मीर सतत अशांत ठेवण्यासाठी पाकधाजिर्ण्या संघटना किरकोळ घटनांचे निमित्त शोधीत असतात.महिनाभरातल्या घटनांनी मात्र नंदनवनाच्या शांततेला पुन्हा ग्रहण लागले आहे.काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलाच्या धाकाचीच नव्हे, तर प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचीदेखील तितकीच आवश्यकता आहे.काश्मीरमध्ये कोणतीही मोठी हिंसक घटना घडवण्यात दहशतवादी यशस्वी झाले नाहीत. बहुतांश दहशतवादी एकतर ठार झाले अथवा पकडले गेले. मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर श्रीनगर खो-यात दहशतवाद्यांना सुरक्षा दलाची उपस्थिती मान्य नाही. काश्मीर सतत रक्तरंजित आहे. पाकिस्तानचा प्रत्येक शासक मग तो लष्करी हुकमशहा असो की पंतप्रधान वा राष्ट्रपती, प्रत्येकाने काश्मीर प्रश्नाबाबत आजवर दुटप्पी धोरणच अवलंबले. भीतीपोटी काश्मीरची सर्वसामान्य जनता गप्प आहे.
इतिहासाची पाने चाळली तर असे लक्षात येते की महंमदअली जिनांपासून कोणत्याही पाकिस्तानी शासकाला काश्मीरशिवाय पाकिस्तान ही कल्पनाच मान्य नाही, जिनांनीही त्यासाठी दुहेरी नीतीच अवलंबली.यासाठी त्यानी भारताशी युद्ध पुकारले आणि उर्वरित काश्मीर खो-यावर कब्जा करण्याचा व्यर्थ खटाटोप करून पाहिला.प्रत्यक्षात प्रत्येकवेळी त्यांचा पराभव झाला.
शब्दांच्या विपरीत कृती हेच पाकिस्तानविषयी भारताला वाटणा-या अविश्वासाचे कारण आहे.'काश्मीर' हा पाकिस्तानच्या धोरणाचा अविभाज्य भाग असल्याने काश्मीरमघ्ये कधी शांतता प्रस्थापित होईल का?
काश्मिरात फिरताना हे 'झेलमचे अश्रू' सारखे दिसत राहतात.आता 'मिशन कश्मीर'हवे.असेच झेलम भिजल्या डोळ्यांनी जगाला सांगते आहे.
1 comment:
पाकिस्तानात राज्य कुणाचे आहे हे स्पष्ट होईपर्यंत पाकिस्तानशी संबंध स्थगित ठेवणे शहाणपणाचे नाही.
Post a Comment