Monday, July 19, 2010

निसर्गावर आपली छाप चागंल्या कामाने करा.

   काल माणिकगडावर जाणार होतो पण नेहमीचे माझे सहकारी जमले नाहीत पण गडावर जाण्यासाठी नवखे व संख्येने कमी सहकारी आणि जमले ते ही उशिरा.मग़ आम्ही माणिकगडावर न जाता कर्नाळा जाण्याचे ठरविले.तसे या अगोदर चार/पांचवेळा या अभयारण्यात व गडावर फिरुन आलेलो आहे.पाऊस नव्हता व गड चढण्यास उशिरा सुरु केल्याने सुरुवातीला मोठी मडंळी दमली.अभयारण्य  हिरवाईने नटलेले आहे.मघ्ये मघ्ये मोर साद घालीत होता.प्रसन्न वाटत होते. काही मडंळी पहिल्यांदा ट्रेकला आल्याने चढण्यास उशिर होत होते.पाणी पित धापा टाकीत पहीला टप्पा चढले.खालील परीसर वरुन पाहील्यावर मडंळी खुष झाली.मग हुरुप आल्याने पुढचा ट्रेक पटापट चढत चढत गेलो.आता आम्ही समोरच ढगात लपलेला 'माणिकगड' पाहत होतो. दरवाज्याने आत शिरलो तेव्हा सर्वाना आनंद झाला.
     समोरच अगांवर येणारा सुळका दिसतो.काळ्या कातळाचा सुळका कपारी कपारीचा दिसतो.खालुन दिसणारा आगंठ्याच्या आकाराचा सुळका जवळुन पाहण्यास आनंद वाटला.सुळक्यावर मघ्ये मघ्ये डाग दिसले. नीट पाहील्या नतंर कळले हायर्क्स नी त्या सुळक़्यांच्या दगडांवर त्यानी त्याची नांवे सफेद रगांत लिहीलेली दिसली. सुळक़्याचे सौदर्य या कृत्तीने झाकळलेले दिसले. निसर्गाचे सौदर्य आपण नेहमीच खराब करीत पयर्टक प्रेक्षणीय स्थळाना भेट देतात व त्या ठिकाणी आपली नांवे कोरतात.ह्या कृत्तीला ते गुन्हयास प्रात्र होतात. तरीही हे पयर्टक स्थळांची शोभा खराब करतात.  परवा माथेरानला घोघानी मार्गे गेलो तेव्हा 'लुईझा' पाँईंटला गेलो तेथेही खडकांवर प्रेमीनी आपली नांवे कोरली आहेत.का ही मडंळी निसर्ग खराब करतात? त्यापेक्षा निर्सगातला आपण केलेला कचरा काढुन समाज कार्य करावे. आपली नांवे न लिहीता गड,किल्ले साफ़ करुण्याचीही कामे या नांवे लिहीणा-यानी करावी.
या सुळक्या सारख्या ठिकाणी सामान्य माणुस चढु शकत नाही.तेथे फक्त जाणकार ट्रेकर साधन सामुग्रीच्या मदतीने चढु शकतात.मग हे साहसवीर आपण केलेल्या यशस्वी चढाई ची नोंद या ठिकाणी का करतात?गडप्रेमीनी या ट्रेकरना अशा गोष्टीपासुन दुर राहण्याची विनंती करावी. ट्रेकरनीही या गोष्टी न करता इतर ट्रेकरनादेखील यापासुन लांब ठेवावे. ट्रेकरनी असे केल्यास काही दिवसानी प्रेक्षणिय स्थळे,गड किल्ले पाहण्यास कोण जाईल का?

No comments: