ब्रॅन्ड ची किंमत मोठी असते.त्यामुळे उत्पादनाची किंमत वाढते.सर्वांचा लाडका सचिन असो नाहीतर महेंदसिंग धोनी, वीरू सहवाग किंवा अमिताभ बच्चन नाहीतर ऐश्वर्या रॉय... प्रत्येकाच्या लोकप्रियतेनुसार ज्याने त्याने स्वत:ची ब्रॅन्ड मुल्य ओळखली आहे.
वाघ,हत्ती,आकर्षक न दिसणारी मगर क्रोकोडाइल,कासव,ससा असे प्राणीशक्तीचं प्रतीक असल्याने कुठे ना कुठे ब्रॅन्ड म्हणून वापरले जाणं स्वाभाविकच. राजकीय क्षेत्रापासून चहा आणि मद्यापर्यंत कोणत्याही ठिकाणी असे शक्तिशाली ब्रॅन्ड उपयोगी पडतातच.सृष्टीतली ही ब्रॅन्ड व्हॅल्यू आपल्यापाशी कायमच होती आणि आहे. 'तुमचा ब्रॅन्ड कोणता' या प्रश्नाकडे दारु किंवा सिगरेट या सदर्भातच पाहिले जात होते. आजच्या काळात ब्रॅन्ड या शब्दाला आलेली किंमत व त्याला जोडली गेलेली प्रतिष्ठाही लक्षात येऊ शकेल. गेल्या काही वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आहे. माकेर्ट खुलं झाल्यामुळे एकाच उपयोगितेची भरपूर उत्पादनं शेल्फवर दिसू लागली आहेत. त्यामुळेच केवळ दृश्य स्वरूपावरून ग्राहकाला वस्तूची ओळख होणं आता शक्य राहिलेलं नाही. बाजारपेठेत वस्तू किंवा सेवांचा पुरवठा भरपूर आहे आणि त्यातून योग्य वस्तूची निवड करणं हे ग्राहकांसाठी नेहमीच आव्हान असतं. त्यामुळे ब्रॅन्डचं खरं महत्त्व कळते.
मँगो, नाईकी, नक्षत्र, टीटान, लेवीस अँड वेंग्लर, टॉमी हायफिंग्लर, आदिदास, राल्फ लॉरेन, मार्कस स्पेंसर, ख्रिस्टीअन डायर... हे शब्द म्हणजे शॉपिंग सॅव्ही तरुण पिढीचे कीर्वड्स आहेत. नव्याने वाढत असलेल्या भल्यामोठ्या वर्गासाठी फॅशन आणि रेकग्नाईज्ड ब्रॅन्ड ही चैन किंवा आकर्षण न रहाता गरज बनू लागली आहे. एकेकाळी फक्त दोनच ब्रॅन्ड प्रसिद्ध होते... टिकाऊ आणि मळखाऊ! लोकांच्या या बदलत्या अपँटिट्यूडकडे पाहिल्यास ब्रॅन्ड परवडायला लागले तरी ब्रॅन्डेड कपडे हे फक्त ग्रेट फिगर आणि हाइट असणा-यांसाठीच असतात, असाही एक न्यूनगंड होता. पण नव्याने डेव्हलप होणा-या अनेक ब्रॅन्डनी या प्रश्नावरही शिरजोरी केल्यामुळे ब्रॅन्ड कॉन्शसचा विस्तार आणखीनच झपाट्याने झाला आहे.ब्रॅन्ड कधी नावाच्या रूपात असतो, कधी चिन्हांच्या, कधी उत्पादनातील आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांच्या तर कधी अगदी छोट्याशा रूपात ग्राहकांसाठी केलेल्या सदिच्छा प्रयत्नांच्या. सोनी, नोकियासारखी कंपनी काही उणिवांमुळे त्यांची उत्पादनं जेव्हा बाजारपेठेतून माघारी बोलावते, तेव्हा त्यातून ग्राहकांच्या प्रती असलेल्या जाणीवेचा आविष्कार ठसवण्याचा प्रयत्न आपोआपच घडून जातो. उत्पादनावर ग्राहकांच्या स्मरणात राहील असा ठसा म्हणजेच ब्रॅन्डनिमिर्ती. आताच्या आधुनिक आविष्करात ही वेगवेगळी चिन्हं, प्रतीकं, नावं, नावांचं सुलेखन आदी रूपात पाहायला मिळतो.वारंवार तीच वस्तू खरेदी करून उत्पादनाला आश्रय देणारे ग्राहक हक्काचे निष्ठावंत असतील याची शाश्वती नसते. त्यामुळेच ब्रॅन्ड तयार करणं, हे जिकिरीचं काम असतं वा त्याला दीर्घकाळ लागतो. प्रतिर्स्पध्याला नामोहरम करणं हा ब्रॅन्डबिल्डिंगचा उद्देश असतोच, पण तसं करताना ग्राहकाला गृहीत धरून चालत नाही. ब्रॅन्ड हा वस्तूच्या अस्तित्वापेक्षाही मोठा व चिरंतन असतो.खरेदी या मनुष्याच्या मूळ स्वभावधर्माला अनुसरत झपाट्याने लोकप्रिय होणा-या क्रिएटिव्ह इंडियन ब्रॅन्ड्समुळे आपण आपली स्टाइलिश ब्रॅन्डेड् ओळख जागतिक पातळीवर विस्तारायला सुरुवात केली आहे हे मात्र नक्की!
No comments:
Post a Comment