Thursday, August 19, 2010

खासदारांची विनंती

प्रिय जनता

दिवसभर उन्हातान्हातून जनतेची कामे करीत माया जमविल्यानतंर रात्री पार्ट्या करणारे आम्ही खासदार.जनतेच्या पैशातून आम्हाला राहण्यास बंगला,कामाच्या प्रवासासाठी गाडी,सुरक्षेसाठी पोलिस,आजारपणातील खर्च,वीज बील,टेलीफोन बील,अतिथ्यभत्ता,निर्वाहभत्ता इ.भत्ते मिळतात.असे हे समाज कार्य करणा-या आम्हा खासदाराना पगारही दिला जातो.स्विस बँकेत खाती असणारे आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहणारे, कार्यालयीन खर्च भागवण्यासाठीच्या आमच्या वास्तववादी वेतनात भागत नसल्याने ,  २४ तास जनतेच्या संपर्कात असलेल्या खासदारांनी पगार वाढीचा प्रस्ताव माडंला आहे तर त्याला सगळीकडुन टीका होत आहे.सध्या खासदारांना १६ हजार रुपये वेतन मिळत असून त्यामध्ये वाढ करून ते थेट ८० हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. परदेशातील सदश्यांपेक्षा कमी काम करणा-या आम्हा खासदाराना खुपच कमी वेतन व भत्ते मिळतात याचा विचार कोणीच करीत नाही. कर्ज काढुन निवडणुक लढविणारे आम्ही ते फेडण्याच्या प्रयत्नात घरपडत आहोत.
आम्हालाही सामन्यांसारखे पोट व कुटुंब असताना आम्ही लोकसभेत वेतनासाठी गदारोळ केला तर काय चुकले? आम्हाला सामान्य कामगारासारखे रस्तावर येऊन मोर्चा व संप करता येत नाही.पण आम्ही  आमच्या वेतनासाठी संसदेत गोंधळ घालून पैशाचा अपव्यय करु शकतो.
वर्षभरात कमीकमी वेळ सभेतून काम करणारे आम्हा कोट्यधीश खासदारांची संख्या ३५० वर गेली आहे. राजकीय कामकाजात आम्ही एकामेकांच्या विरोधात असतो. पण या वेतनाच्या मागणीसाठी मात्र आम्ही सर्व खासदार एकत्र आवज उठवितो. आमच्या वेतन वाढीचे ठराव आम्हीच एकमताने तात्काळ मंजुर करतो.याचवेळेला थोडासा गोधंळ झाला. आमच्या या वेतनवाढीच्या मागणीस जनतेने पाठींबा देऊन आमच्या साध्या राहणीमान असलेल्या खासदाराना मदत केल्यास आम्ही जनतेची कामे आणखी तन्मयतेने करु असे वचन देतो.

                                                                                                          सर्व पक्षांचे  खासदार

No comments: