'झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा ' अशी राष्ट्रभक्तीपर गाणी आपल्याला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी अगदी आवर्जून आठवतात. पण आपलं हे देशप्रेम व्यक्त करतेवेळी मात्र आपल्याच आजूबाजूला कोणाकडून झेंड्याचा अवमान तर होत नाही ना याचं भान आपण कसे ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रतीक असणा-या तिरंग्याच्या बाबतीत कोणताही हलगजीर्पणा चालत नाही. निमिर्तीपासून ध्वजारोहण आणि ध्वज उतरवेपर्यंत एखादी चूक झाल्यास तो गुन्हा मानण्यात येतो. अशी चूक करणा-या व्यक्तीला दंड किंवा तुरुंगवास किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
छातीवर गोळ्यांचा वर्षाव झाला तरी हाती असलेला तिरंगा न सोडणारे देशप्रेमीं आणि स्वातंत्र्यसैनिक होउन गेले आहेत. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी तसा देशाभिमान असावा लागतो.
पाकिस्तानच्या दौ-यातील बैठकीदरम्यान भारताचा राष्ट्रध्वज उलटा लावल्याचे आढळल्याने भारताच्या गृहमंत्र्यानी यांनी ही बाब मलिक यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली. मलिक यांनी याबाबत खेद व्यक्त केला.
तिकिटांवर भारतीय तिरंगा उलटा छापण्यात आला असल्याचे सचिनने भारतीय संघ व्यवस्थापनाला कळवले. भारताने हा प्रकार पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या लक्षात आणल्यानंतर धावपळ उडाली आणि असा प्रकार होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले.
असेच भान ठेवून प्रत्येकाने तिरंग्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
भारत माता की जय.
No comments:
Post a Comment