' तुझ्या घरात नाही पाणी , घागर उताणी रे गोपाळा ' असा गजर करत दोन इमारतींमध्ये उंचावर लटकलेली दहीहंडी फोडायला सरसावलेली गोविंदा पथकं म्हणजे निव्वळ टारगट पोरांची हुल्लडबाजी नव्हेच. या मराठमोळ्या सोहळ्याने अठरापगड मुंबईत पाहता पाहता वेगळंच रूप धारण केले. माणसांचा हा मनोरा आता गिनीज बुकाकडे सरसावू लागलाय.
पण टारगट पोरांचा हा धाडसी गोविंदा आता शिस्त , सहनशक्ती , वेळेचं नियोजन , टीमवर्क , चपळता , आत्मविश्वास यांचं आदर्श उदाहरण बनला आहे. राजपथावरून सा-या जगाला महाराष्ट्र संस्कृतीचं अनोखं दर्शन याच गोविंदानं घडवलं आहे. संस्कृती व परंपरा विसरत चालल्याच्या तरुणांवर होणा-या आरोपांनाही याच गोविंदा पथकांनी आपल्यापरीनं उत्तर दिलं आहे.राजकारण्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच प्रसिद्धीसाठी मुंबईचा गोविंदा हा हुकमी एक्का वाटू लागला आहे. या सणात राजकिय पक्षानी घुसखोरी केल्यापासुन गोविंदा पथके व्यवसायिक झाले आहेत.राजकिय नेत्यानी मोठ्या मोठ्या रक्कमांच्या दहीहंड्या बांघुन त्यांच्या उंच्या वाढविल्या आहेत.हंडीच्या वाढत्या उंचीबरोबरच मंडळांना होत असलेलं अर्थार्जन आणि मिळत असलेल्या लोकप्रियतेची भुरळ आता ठाणे,पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पडू लागली आहे. दहिहंड्यावर लागणा-या लाखो रुपयांच्या बक्षिसांमुळे ठाणे हे गोविंदा पथकांसाठी प्रसिध्द शहर बनलं आहे.
यंदा १५हून अधिक गोविंदा मंडळांच्या वेबसाइट सुरू होत आहेत. ब्लॉग आणि सोशल नेटवर्किंगवरूनही मंडळांचा संवाद सुरू झालाय. मुंबईच्या गोविंदाने जागतिक नकाशावर आपली उंची वाढवण्यासाठी इंटरेनटच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचीच ही उदाहरणे आहेत.
दहीहंडीचे थर रचताना पडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनांमुळे उत्सवालाच गालबोट लागत असल्यामुळे छोट्या गोविंदा मंडळांमध्ये विमा तसेच इतर सुरक्षेविषयी जागृती आणण्यासाठी मोठ्या गोविंदा मंडळांनी यावर्षी पुढाकार घेतला आहे. एक हजारहून अधिक लहान गोविंदा मंडळांची आर्थिक बाजू लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी प्रिमियम कमी करावा, अशी मागणी मोठ्या मंडळांनी केली आहे.दहीहंडीआधी दोन दिवस एकत्र जमायचे... थोडा सराव करायचा आणि 'गोविंदा आला रे ' म्हणत घराबाहेर पडायचे, अशी अनेक मंडळे मुंबईत आहेत. त्यातील बालगोपाळ मोठ्याप्रमाणात जखमी होत असल्याचे चित्र गेल्या पाच वर्षांत दिसून आले. हे लक्षात घेऊन आपल्या विभागातील छोट्या गोविंदांना एकत्र आणून सुरक्षेविषयी, विमा नियमांविषयी आणि सरावाविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय मोठ्या गोविंदा पथकांनी घेतला आहे. १०० गोविंदा मंडळांमधील ५० गोविंदा खेळाडूंना मोफत विमा देण्याचा निर्णय एका खासगी कंपनीने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी 'द ओरिएण्टल इन्शुरन्स कं. लि.' या सरकारी उपक्रमासोबत करार केला आहे. यंदा आम्ही प्रत्येक खेळाडूमागे केवळ ३५ रुपये प्रिमियम ठेवला आहे. मंडळांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी यंदा आम्ही पत्रकेही वाटले आहेत्.
मुसाफिरखान्यात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून बांधलेली मोठ्या रक्कमेची दहीहंडी दक्षिण मुंबईचे मोठेच आकर्षण ठरते.
उत्साहाच्या भरात हंड्या फोडण्यासाठी थरांवर थर रचणा-या गोविंदांपैकी अनेकांना उत्साह नडला आहे.
गोविंदा पथकांना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे पाठबळ असते. त्यामुळे अनेकांचे टीशर्ट, कपाळाला बांधायला दिलेल्या पट्ट्या 'स्पॉन्सर्ड' केलेल्या असतात. पथकाच्या ट्रकला, बाइकवर राजकीय पक्षाचे झेंडे फडकताना दिसतात.जिद्द , शरीरचापल्य , ताकद , कौशल्य आणि एकाग्रतेच्या जोरावर मुंबईतील गल्लीबोळात रचल्या जाणारे बालगोपाळांच्या मानवी मनोरे आर्कषित करतात.
जाहिरातीच्या युगातही ह्या दहीहंड्याचा चांगला उपयोग करुन घेत जात आहे. हायटेक युगातल्या या माखनचोरांनी मात्र 35 ते 40 फूट उंचीवरूनही माखन पळवण्याचं आत्मसात केलेलं कौशल्य कॅमे-यात टिपण्यासाठी आता खास परदेशी बाबूही मुंबईत डेरेदाखल होऊ लागले आहेत.
पाच वर्षांपूर्वी शेवटच्या थरावर कृष्णाच्या वेशभूषेतल्या एका लहानग्या मुलीला चढवून गोविंदा मंडळाने एक विक्रम नोंदवला होता.नंतर अनेक गोविंदा पथकांमध्ये शेवटच्या थरावरून हंडी फोडण्याचा मान लहान मुलाना चढविण्याची प्रथा रुढ झाली आहे.पण या पध्दतीने लहान मुलांचे अपघात वाढत गेले आहेत.
दहिहंडी उत्सवाच्या होत असलेल्या व्यावसायिकीकरणा होत आहे.तरी गोविंदा पथकं मात्र याचं समर्थनच करत आहेत. यावर्षी गोविंदाना हा उत्सव विनाअपघाताचा जावो.
No comments:
Post a Comment