Thursday, August 12, 2010

मालवाहु जहाजांची टक्कर

    शनिवार पासुन वृतपत्रांची पाने या दोन जहाजांच्या टक्कर होण्याच्या दुर्घटनेबद्दल भरुन येत आहेत.
कुलाब्याजवळील समुदात दोन जहाजांची टक्कर होण्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली.'चित्रा' जहाज जेएनपीटीहून निघाले असता मुबंई बंदरात येणा-या 'खलिजा'शी त्याची टक्कर झाली. जसे एका रस्त्यावरुन दोन मोटारगाड्या जात असताना समोरासमोर ठोकर व्हावी तसेच एकाच चँनलमघुन प्रवास करणा-या या दोन जहाजांची टक्कर झाली. कंटेनर्स भरलेले 'चित्रा' जहाज समुद्रात कलंडले तर 'खलिजा' या जहाजाला मुबंईत बंदरात खेचत नेले.
    अशा घटना क्वचितच घडतात पण ही घटना मानवीचुकेमुळे झाली असावी.अपघाताची चौकशी झाल्यावर जबाबदार व्यक्तीना शिक्षा होईलच. टकरीनंतर मुंबईनजीकच्या समुद्रात झालेली प्रचंड तेलगळती तसेच समुद्रात पडलेल्या कंटेनर्समधून तेल तसेच काही रसायने समुद्राच्या पाण्यात मिसळण्याचा धोका या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांना 'अँलर्ट' देण्यात आला होता.समुदात साडलेल्या तेलाने पार एलिफंटा लेणी, अलिबाग, उरणपर्यंतचे टोक गाठले होते.समुद्रातील भरतीने हा तवंग दूर करण्याचे कामही मोठ्या वेगाने हाती घेण्यात आले आहे. समुदात अधूनमधून जहाजावरील कंटेनर तरंगताना दिसून येत असल्याने अपघात टाळण्यासाठी या भागातील समुद्री वाहतूक थांबवण्यात आली.
टक्कर झालेल्या 'चित्रा' या बोटीमधील तेल झपाटयाने पसरत गेले त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न झाला आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाने याप्रकरणी दोन्ही जहाज मालकांविरोधात न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली आहे. तेलगळतीमुळे माशांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होऊन त्याचा फटका छोट्या मच्छिमारांना बसला आहे.

पाण्यात इतस्तत: वाहून गेलेल्या कंटेनर्सच्या रुपात हा धोका निर्माण झाला आहे.हे कंटेनर या परिसरात कुठेही जाऊन समुदतळाशी बसले तर ये-जा करणा-या जहाजांचे बुड त्यावर धडकण्याचा धोका आहे.जहाजावरील काही कंटेनर समुद्रात तरंगत असून काही खोल समुद्रात बुडाले आहेत. काही कंटेनर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जहाजांच्या मार्गात अडकले आहेत. या कंटेनर्सपैकी काही कंटेनर फुटून त्यातून कॉफी पावडर, दुधाची पावडर व कडधान्य आदी सामान समुद्रावर तरंगत आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण तेलगळतीची हवाई पाहणी केल्यानंतर वेगवेगल्या राजकिय पक्षामुळे उपमुख्यमंत्री यांनीही तेलगळतीची हवाई पाहणी केली.
या अपघाताने दोन्ही बंदराचे मोठे नुकसान झाले आहे.संबघित यंत्रणा नुकसान कमी होण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत.पर्यावरणाचे नुकसान भरुन येण्यास खुप दिवस लागतील.

3 comments:

महेंद्र said...

हे कसं झालं आणि कसं टाळता आलं असतं हे वाचायला आवडेल. :)

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

चित्रा हे जहाज टक्करीनंतर कलंडून बंदरातच अडकून पडल्याचे अनेक फोटो पाहिले. दुसर्‍या खलिजा जहाजाचे काय झाले? प्रत्यक्षात कोणत्या जहाजावर दुसरे जहाज आदळले? वृत्तपत्रे वा वाहिन्यानी या बद्दल काहीहि उत्सुकता दाखवलेली दिसली नाही. घटना स्थळाचा खरा नकाशाहि कोणी मिळवून छापला नाही. आपली पत्रकारिता ही अशी आहे.

VIVEK TAVATE said...

जेनपीटी व मुबंई या बदंरांतील जहाजांच्या जाण्या व येण्यासाठी वेगवेगळे मार्ग असावेत.