आषाढातला झिम्माड पाऊस विसावतो अन् ऊन पावसाचा खेळ मांडत ढगांआडून हळूच श्रावण डोकावतो. हा महिना निसर्गात चैतन्य फुलवणारा. रानांतल्या गवतपात्यांवर रानफुलांची नक्षी उमटवत करड्या आभाळाला इंदधनुष्याचं तोरण लावणारा.
श्रावण म्हणजे नवचैतन्याचा काळ, नवजीवनाचा काळ. वनस्पती, कीटक, फुलपाखरं अशा छोट्या जिवांचा जन्मकाळ. आषाढातल्या पावसाने सारी सृष्टी चिंब भिजून हिरवीगार होते. बिजं अंकुरतात, नव्या वनस्पती उगवतात, वेली वाढतात, झाडांना नवा पर्णसंभार येतो. सर्वत्र फक्त हिरव्या रंगाचं साम्राज्य येतं. पाचूच्या सृष्टीवर फुलांची सप्तरंगी पखरण होण्यासाठी थोड्या सूर्यकिरणांचं चैतन्य आवश्यक असतं. खरं म्हणजे उन्हाची तिरीप आल्यावरच वनस्पतींना फुलं येतात, कारण परागीभवन करणारे कीटकही तेव्हाच जन्मतात. मग एक दिवस काळ्या ढगांचं आभाळ पारदर्शक करत मनभावन श्रावण मास दाखल होतो. हिरवी सृष्टी रंगीबेरंगी होऊन जाते. इंदधनुष्याच्या भव्य कमानीमधून सूर्यप्रकाशातले सप्तरंग हिरव्यागार धरणीवर फुलांमधून उमटतात. सा-या सृष्टीत फुलांचा महोत्सव सुरू होतो. या आनंद सोहळ्यात केवढी विविधता असते. आकारांचं, रचनेचं वैविध्य, रंगांच्या मोहक छटा, त-हेत-हेचे सुगंध तरल मनाला खूप भावतात. सारा आसमंत आपापली वैशिष्ट्यं बाळगून या पुष्प-सोहळ्यात सामील होतो. श्रावण मासाची चाहूल आपल्या अंगणातल्या, परसातल्या किंवा गच्चीतल्या झाडांना लागलेली पाहूनच आपल्याला श्रावणाची जाणीव होते. येण्या-जाण्याच्या वाटेवरची रोजच्या पाहण्यातली झाडं फुलांनी बहरल्याचं लक्षात येतं. फुलणा-या फुलांच्या सा-या झाडांमध्ये श्रावणाचं सर्वात जास्त उत्साहाने स्वागत करणारा वृक्ष म्हणजे प्राजक्त! पारिजातकाच्या फुलबहाराचं काय वर्णन करणार?
सृष्टीला सौंदर्याचं देणं देणारा, निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि मनामनाला स्वच्छ, नितळ हवेचं गोंदण देणारा श्रावण! अनेक रंगांच्या नाना छटा देऊन अवघ्या आसमंताला रंगात बुडवून टाकणारा रंगीला श्रावण.मनाला हिरवाकंच करून आनंदाची बरसात करणारा श्रावण.श्रावण म्हणजे सृष्टीचा रसरशीत आविष्कार.श्रावणातला हा पुष्प खजिना लुटण्यासाठी आषाढाने भिजवलेली तनमनं झटकून टाका,उल्हसित व्हा.धुंद करणारा निसर्ग अनुभवा.
श्रावण संपला तरी त्याने मनाला दिलेली उत्साहाची उमेद वर्षभर कायम राहते.

1 comment:
सुरेख
Post a Comment