मी व माझे सहकारी तीस वर्षापूर्वी नोकरीला लागलो.तेव्हापासून वेगवेगळ्या जाती घर्माचे असूनदेखीले आम्ही मित्र झालो.तीस वर्षे म्हणजे तीन तपे कशी पार पडली ते कळलेच नाही.हल्ली आम्ही सर्व जण विखुरलेले आहोत.पून्हा एकदा एकत्र येवून गतस्मृतीना उजाला देउन आपापल्या सुख दुख:चा लेखा-जोखा मांडायचा व पुढील वाटचालीसाठी हातात हात घेऊन काळाचे आव्हान घेण्यासाठी सा-यांना आग्रहांचे व कळकळींचे मनापासून आमंत्रण दिल्यानतंर सर्वजणानी तयारी दाखविल्यावर पुढचा कार्यक्रम ठरविले.
तीसवर्षापूर्वी मिशी फुटलेले तगडे तरुण नोकरीच्या निमित्तने एकत्र आलेले आता दात पडलेले,चष्म्यासह ट्क़ल पडलेले असे पन्नाशीच्या जवळ आलेले पण मनाने अजुन तरूण असलेले मित्र 'बदलापुर' येथे एका रिसोर्टवर जमलो.रिसोर्टवर जमल्यावर चहापाणी व गप्पागोष्टी केल्यानतंर छोटासा कार्यक्रमात गुजगोष्टी केल्या. आमच्यातले चार मित्र आजारामुळे आता आमच्या नाहीत त्याना आम्ही श्रध्दांजली वाहीली.सुट्टीचा दिवस नसून देखील सर्वजण जमले होते.सर्वानी आपाल्या आयुष्याची महत्वाच्या गोष्टी कथन केल्या.तीन मित्रानी काही वर्षापूर्वीच नोकरी सोडली आहे तेही या मैत्रीमेळाव्याला आर्वजुन आले व मित्रांच्या भेटीने खुष झाले. सर्व मित्रानी मग रेसाँर्टवर असलेल्या स्विमींग टँकमघ्ये उड्या मारुन मौजमजा केली.वयाने नाही पण मनाने तरुण होउन मनमुराद मजा लुटली.खुपवेळ डुंबलो.पावसात डुंबायला मजा येत होती. खुप मजा केली. नाचगाणी झाली.स्विमींग टँकमघुन बाहेर पडण्यास तयार नव्हते.शेवटी या तीस वर्षाच्या अखंड मैत्रीची आठवण म्हणुन एक सन्मानचिन्ह सर्वाना दिले.
आठवणी जमा करत करत दिवस कधी संपला तेच कळले नाही. नोकरीतल्या शेवटच्या पर्वासाठी एकामेकाना शुभेच्छा दिल्या.असेच पुन्हा पुन्हा भेटण्य़ाचे वचन देत निरोप घेतला.
No comments:
Post a Comment