Monday, August 23, 2010

२२ आँगस्ट वृतपत्र लेखक दिन.

तपत्र लेखक चळवळीलाचा हिरक महोत्सवाचा सांगता  समारंभ मराठी वृतपत्र लेखक संघाने वृतपत्र लेखकांचा भव्य मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.वृतपत्रातील पत्र म्हणजे समाजाची स्पंदने,प्रतिक्रीया व आवाज आहे.ती पत्रे प्रथम प्रसिध्द करणा-या 'नवशक्ती' या वृतपत्राने सुरुवात केली होती.त्या वृतपत्राचाही काल अमृत महोत्सव समारंभ केला आहे.मोठ्या संख्येने वृतपत्र लेखक या कार्यक्रमाला उपस्थित होते.या वृतपत्र लेखकांच्या पत्रांचे एक पुस्तक 'जागल्यांचा शब्दजागर'     या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या ह्स्ते झाले.

तसेच जेष्ट वृतपत्र लेखकांचा सत्कार केला गेला. या संमेलनात २२ आँगस्ट रोजी 'वृतपत्र लेखक दिन' म्हणुन साजरा केला जाणार अशी घोषणा केली गेली. संमेलनाचे अध्यक्ष मा.एकनाथ ठाकुर व प्रमुख पाहुणे माजी न्यायमुर्ती व विचारवंत मा.नरेद्र चपळगांवकर, महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा.ना.सुनिल तटकरे,उध्योजक मा. विलास गांवकर,नवशक्ती दैनिकांचे संपादक विनायक पात्रुडकर व मराठी वृतपत्र लेखक संघाचे अध्यक्ष मनोहर साळवी होते. या कार्यक्रमाला सर्व आधाडीच्या वृतपत्रांचे वार्ताहर हजर होते.
वृतपत्र लेखकाना शासनाकडुन पुरस्कार मिळावा असे मा.नरेद्र चपळगांवकर यानी सुचविले तर ही वृतपत्रे समाजातील सर्व गट वाचतात हा त्याचा पुरस्कार आहे. मराठी वृतपत्र लेखक संघाच्या कार्यासाठी पांच लाखाचा निधी सारस्वत बँकेतर्फे मा.एकनाथ ठाकुर यानी जाहीर केला.वृतपत्रांनेच वृतपत्राना पुर्णता येते मा.एकनाथ ठाकुर यांचे म्हणने होते..  पाहुण्यानी वृतपत्र  लेखकाना लिखाणाबद्दल सुचना केल्या.   तर प्रसिध्द झालेल्या पत्राना   शासनाकडुन उत्तर मिळावे व वृतपत्र लेखकाने चागंली सुचना केली असेल तर त्याला प्रशस्तीप्रत्रक देण्यात यावे अशी अर्थमंत्र्यांकडे विनंती करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यानी खुप काम केलेले दिसण्यात आले.

1 comment:

Anonymous said...

Tawate saheb aplya sanghcya karyakramache vrutta aapan aplya blog var prasidha kelet tyabadal abhar -- mi tumchya phon chi vat pahat hoto
malusare ravindra