Thursday, August 26, 2010

हाक

'हाक' ही संभाषणाची सुरुवात. हाकेला साद दिल्यानतंर संभाषण सुरु होते.
हाकेशिवाय बोलणे  सुरु होत नाही.
हाके चे वेगवेगळे प्रकार आहेत.
हाकेतच प्रेम,राग,खुनस कळते.
हाक आधारची,मायेची,मनाची,वासल्याची,ऐक्याची,
मदतीची,आव्हानाची,अंदोलनाचीही असते.
हाक एकासाठी व अनेकासाठीही असते.
कधी कधी हाकेची वाट पाहावी लागते.
हाक केव्हाही येते.



'बाळ' आईचे मुलाला मारलेली मायेची हाक
'अहो' बायकोने नव-याला मारलेली हाक
'प्रिये' प्रेयसीला प्रियकरानी मारलेली हाक
'आई/बाबा' मुलानी मारलेली आधाराची हाक
'बंधुभगीनी' समुदायाला नेत्यानी मारलेली हाक
'डाँक़्टर/सिस्टर' आजा-यानी मारलेली आर्त हाक
'वाचवा' असहाय्याची मदतीसाठी मारलेली हाक
'बंधुनो' नेत्यांनी कार्यकत्त्याना मारलेली हाक



रक्षणाची हाक, केविलवाणी हाक, प्रेमळ हाक,
अस्मितेची हाक,मानवतेची हाक,करुणेची हाक,
एकीकरणाची हाक,ऐक्याची हाक,मनाची हाक
लढ्याची हाक, आपुलकीची हाक

बायका त्यांच्या नव-यांना मजेशीर हाका मारतात.
लग्नानंतर पहिल्या वर्षी: जानू
दुस-या वर्षी: ओ जी!
तिस-या वर्षी: सुनते हो?
चौथ्या वर्षी: ओ मुन्नी के पापा!
पाचव्या वर्षी: कहा मर गये?

अंतर्मनाची हाक आतून येते.
तुमचा विश्वास तुमच्यात निर्माण होतो.
जन्मताच आपण 'आई' ला प्रथम हाक मारण्यास शिकतो.
पक्षी व प्राणीही वेगवेगळे आवाज काढुन एकामेकाना हाका मारत बोलत असतात.
 

नेहमीच हवीहवीशी वाटणारी मायेची आई  ची हाक.



सरते शेवटी माणुस देवाला हाक मारतोच.



No comments: