Saturday, August 28, 2010

कर देण्याची प्रवृत्ती

करवसुली हे प्रत्येक देशाचे उत्पन्नाचे मोठे साधन असते. त्यामुळे कर भरणारा प्रत्येक माणूस कर योजनेकडे साशंक नजरेने पाहत असतो. करापोटी, उत्पन्नातला बराचसा भाग कापून गेल्यामुळे प्रामाणिक करदाता नाराज असतो. कर भरूनसुद्धा सरकार योग्य सवलती पुरवत नाही अशी त्याची तक्रार असते. करयोजना सरळ आणि सोपी करण्यासाठी त्याचबरोबर काळा पैसा हुडकून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तर टॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. करबुडवेपणा कमी होऊन, अधिक पैसा बाजारात येतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास हातभार लागतो.कर वाजवी ठेवणे आणि त्याचवेळी करचुकवेगिरी न परवडणारी ठरेल अशी यंत्रणा अस्तित्वात आणणे गरजेचे असते. करप्रणाली सामान्यांनाही समजणारी, त्यांचे करदायित्व त्यांचे त्यांना ठरवणे शक्य होईल इतकी सुटसुटीत असणे, त्याच्या दरात अनिश्चितता नसणे, कर भरण्याची पद्धत सहज आवाक्यातील असणे, या कर भरण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक अटी आहेत.

सरकारला कारभार चालविण्यासाठी पैसे लागतात आणि आपल्या कमाईतील काही वाटा आपण त्यासाठी देऊ लागतो हे नागरिकांना कळत असले, तरी पूर्णपणे वळत नाही. त्यामुळेच कष्टाने असो वा लबाडीने, मिळवलेल्या उत्पन्नातून सरकारला स्वत:हून कर देण्याची प्रवृत्ती अभावानेच आढळते. परिणामी दंड वा कारवाईचे भय दाखवूनच सरकारला कर वसूल करावा लागतो. मुद्दा हा की कर नाईलाजानेच भरण्याची मानवी प्रवृत्ती दिसते.

अफाट खर्चाच्या 'आयपीएल क्रिकेट' स्पर्घेला करमणुक करातुन सुट दिली जाते म्हणुनच सामान्य नागरिक कर भरण्यास मागे असतो.

भ्रष्ट्राचार न करता सरकारने चागंली कामे केल्यास नागरीकांमघ्ये स्वत:हुन कर देण्याची प्रवृत्ती वाढेल.

1 comment:

Anonymous said...

भारतात आपला लोभीपणा झाकण्यासाठी भ्ऱष्टाचाराची आवई उठविली जाते.