Friday, September 3, 2010

सातम आतम

'जन्मअष्टमी' या सणाला गुजराथी पुरुष एकत्र येवून रात्रभर जागुन (जुगार(तीन पत्ती)) पत्ते खेळतात.


हा पत्त्याचा खेळ खेळणे, हा सण साजरा करण्य़ातलाच भाग आहे.नेहमीच पत्ते खेळले जातात पण
या दिवसाला पत्ते खेळणे हे मानाचे असते.मोठ्या उत्साहाने खेळतात.जुगारात हरलो की
जिकंलो याला महत्व नसते. ही पुरुष मडंळी वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात.
या जुगाराच्या खेळात खुप पैसे लावले जातात.महिलाही मजेसाठी म्हणुन पत्ते खेळतात.
या दिवशी न भांडता खेळायचे असते.पण या वेळेस दारु पित नाहीत.
या  खेळात श्रीमंत व गरीब सर्व जण आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसा लावतात.






वर्षाभरात 'सातम आतम' लाच फक्त पत्ते खेळतात.नतंर पत्ते खेळले तर ते पाप समजले जाते.
'साटम आटम' हा शब्द या दिवसाच्या खेळाला वापरला जातो.
श्रावणाल्या सष्टीला पक्वान्न बनवून सप्तमीला खातात. सप्तमीला घरी काहीच बनवत नाहीत.
सष्टीला जे बनविलेले अन्न सप्तमीला खायाचे असते.'सातम' हे सप्तमी व 'आतम' हे अष्टमी यावरुन
'साटम आटम'हा शब्द आला आहे.




कृष्ण जन्माच्या वेळेला बारा वाजंता फ्क्त काही वेळ खेळ बंद करतात.
खेळताना खाण्यासाठी भरपुर गोष्टी घेऊनच बसतात.
पुन्हा रात्रभर हा खेळ सुरु असतो.
खेळुन समाधान झाल्यावर खेळ संपतो व दुस-या दिवशी या खेळावर चर्चा जोरात असते.


गुजरात मघ्ये या दिवसाला मोठे महत्व असते.सण जोरात साजरा केला जातो.

No comments: