Thursday, September 9, 2010

थेंब

थेंबाने थेबाने तळे साचते.थेंब कमी पडले तर तळे भरत नाही आणि थेंब जास्त पडले तर तळे  भरुन वाहते. म्हनुणच प्रत्येक थेंबाला महत्व आहे.थेबात ताकद असते.थेंब मोठे असतात, तर काही थेंब छोटे असतात.  थेंबाचा आकार वेगवेगळा असतो.  थेंबाथेबाने मोठा प्रवाह बनतो.
द्रवाचा आकार हा एक थेंब.
घरतीला पावसाचा थेंब,
फोडणीला तेलाचा थेंब,व्यसनीला दारुचा थेंब,
औषधाचा थेंब ,ड्रगचा थेंब,
 कॅनव्हासवरचा रंगाचा थेंब तर थेंबा थेंबाचा अभिषेक.

 बिकट परीस्थिततीत प्रत्येक थेंबाला फार मोठे महत्व असते.
                                                        शेवटच्या थेंबालही मोठेमहत्व असते.

मी एक थेंब.......



   जीवनाच्या पावसाबरोबर येणारा
       आयुष्याच्या पानावर विसावणारा
           काही क्षण विसावून ओघळून जाणारा
               दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा
                    कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा
                         क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा
                              अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा
"थेंब अश्रुंचे दोन गालावरती,कसे पुसायाचे राहून गेले,लपविलेले दु:ख माझे,चार चेहरे पाहून गेले.."





"एक थेंब परिश्रमाच्या घामातला,जिंकण्याची उमेद बाळगलेला.अन एक थेंब अखेर.आठवणीच्या स्पंदनातला, ओल्या पापण्या अन ओल्या कडांतून मना ओलावलेला. "


पाऊस थांबल्यानंतर त्यांच्या पर्णांवरील पाणी थेंब,
 थेंब करीत खाली धरतीवर पडते तेव्हा त्यांतून "टप,टप,टपाटप,ट प,ट पॉ प" असे
"सा,रे,ग,म,प,ध,नी,सा" चा रियाझ करणारे संगीत निर्माण होते.




'भेट तुझी माझी स्मरते,अजून त्या दिसाची',

   'धुंद वादळाची होती रात्र पावसाची',
        'केस चिंब ओले होते,थेंब तुझ्या गाली',
             'ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली'.
या कवितेत 'थेंब' या शब्दाचा योग्य उपयोग केला आहे.



कोसळणारा पाऊस,रानझाडातून थेंब थेंब ठिबकू लागतात
आणि त्याच्या ओल्या स्पर्शाने एखादी कविता सुचू लागते.



माझ्या शरीतात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यत देशासाठी लढण्याची प्रतिज्ञा आपला प्रत्येक शिपाई घेतो.

No comments: