Friday, September 10, 2010

मुबंईकरांनो,गणेशोत्सवात सावध रहा.

सर्व दुःखांचे हरण करणा-या विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा उत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात घातपात घडवण्यासाठी दोघे परदेशी अतिरेकी मुंबईत घुसले असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, मुंबईतील नागरिकांना सतर्क राहण्याचा व सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दोन विदेशी संशयित अतिरेकी मुंबईत घुसले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन घातपात घडवण्याचा त्यांचा कट आहे. कलीमुद्दीन खान ऊर्फ रामेश्वर पंडित (वय २५) आणि हाफिज शरीफ (वय २८) अशी या दोन संशयित अतिरेक्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस सह आयुक्त हिमांशू रॉय यांनी आज दिली. एवढेच नव्हे तर या दोघा संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रेही पोलिसांनी जारी केली आहेत. या दोघांची माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांच्या २२६३३३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तरीही गणपती बाप्पा आपले रक्षण करतीलच.


               !!   गणपती बाप्पा मोरया    !!

No comments: