मॅच फिक्सिंग म्हणजे संपूर्ण सामन्याचा निकाल फिक्स करणे.क्रिकेट रसिकांची ही खुली फसवणुक असते. मँच फिक्सिंग, बेटिंग, डोपिंग, स्लेजिंग अशा अनेक अपप्रवृत्ती क्रिक़ेट खेळात आल्या आहेत.गेले दशकभर मॅच फिक्सिंग हे दोन शब्द धुमाकुळ घालताहेत. अझरुद्दिन, जडेजा, क्रोनिए वगैरे गुणी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ही कायमस्वरूपी भेट आहे. सट्टेबाज, गुंड आणि राजकारणी यांच्या अभेद युतीतून मॅच फिक्सिंगचा अपप्रकार जन्माला आला आहे. त्यामुळे सामन्यांचे निकाल आजकाल मैदानात न लागता मैदानाबाहेरच लागतात. क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग हा प्रकारच अस्तित्वात नाही असे काही जण म्हणत असतात. तर मॅच फिक्सिंगशिवाय क्रिकेट सामना पूर्णच होऊ शकत नाही असे काहींचे म्हणणे असते.क्रिकेट हा आता पैशाचा खेळ झाला असून, सट्टेबाजांच्या मर्जीनुसार क्रिकेटपटूंना खेळावे लागते. क्रिकेटपटूंना असणारी पैशाची हावही त्यास कारणीभूत आहेच.
पाकिस्तान संघातील आमिर, आसिफ व बट या खेळाडुवर स्पॉटफिक्सिंग केलेल्याचा आरोप झाला. पाकिस्तानपाठोपाठ आता फलंदाज दिलशान तिलकरत्न आणि तेज गोलंदाज दिलारा फर्नांडो हे श्रीलंकन खेळाडू मॅचफिक्सिंगमध्ये अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सचिनप्रमाणे,'आमचा कुठलाही खेळाडू बुकीच्या संपर्कात नाही' असे संगकारा म्हणाला आहे.मग उगाचच आयसीसी लाचलुचपत विरोधी पथकाने त्यांची चौकशी करीत आहेत.जेष्ट खेळाडुना या बद्द्ल काही माहीती असल्यास आयसीसी लाचलुचपत विरोधी पथकाला देउन मॅचफिक्सिंग या अपप्रवृत्तीला विरोध दर्शवावा.संधातील खेळांडुना याची कुणकुण लागल्यास वरीष्ट अधिका-याना कळविल्या पुढे होणारी मॅच फिक्सिंग तरी टळले. क्रिकेट बोर्डाने काही खेळांडुना मॅच फिक्सिंगची माहीती मिळविण्यासाठी वापरले
तर या अपप्रकाराला थोडी बधंने येतील.काही खेळाडु सामन्यागणिक बदलत राहिल्यास हे प्रकार काही प्रमाणात कमी होतील.
खेळात पारदर्शकता आणायची असल्यास मॅच फिक्सिंग करणा-या खेळाडूंवर आजीवन बंदी घालायला हवी.एक नासका आंबा सर्व आंब्याना नासवु शकतो.म्हणुनच क्रिकेटची शान कायम राखण्यासाठीही खेळाडू दोषी आढळल्यास त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्याची शिक्षा सुनावणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment