Sunday, November 7, 2010

"मी हाय कोली"

   अमेरिकेच्या प्रेसिडेंट कपलने "मी हाय कोली" या कोळी गाण्यावर लहान मुलांसह ताल धरावा,ही मराठी आणि तमाम कोळीबांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लहान मुलांनी ओबामा दांपत्याना नाच करण्याची विनंती केल्यावर ती दोघेही स्वत:हुन त्यांच्यासह कोळी गाण्यावर थोडा वेळ नाच केल्याने त्या छोट्यामुलांनाही मोठा आनंद झाला.सर्व मराठी वृतपत्रानी ह्या बातमीला पहील्या पानावरची मोठी प्रसिध्दी दिली आहे.काल चँनलवरील ब्रेकिंग न्युजमघे हेच सारखे दाखवत होते.सगळीकडे ह्या कोळी गीताची चर्चा सुरु आहे.त्या दोघानी नाच करुन सर्वाची मने जिंकली आहेत.  कोळीनृत्यावर पाय थिरकले नाहीत असे सहसा होत नाही.पण ही दोघेही या नाचात सहभागी झाले हे दृश्य विलक्षण होते.
या अध्यक्षपदाचे वलय बाजुला सारुन दोघाना नाचताना पाहुन सारेच आचंबित झाले.ओबामा काहिसे बुजरे वाटले पण  मिशेल मात्र सफाईदारपणे नाचल्या.ह्या प्रतिष्टीत व्यक्ती असे नाचगाणी करुन स्थानिकांची मने जिकंतात.
हे कोळी गाणे सर्व गरबातुन वाजत असते.हे कोळी बांधवानाही खुप आवडीचे आहे. सर्व समारंभातुन या गाण्यांवर दर्याचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या कोळी कोळीबांधव पांरपारीक वेशभुषेत नाचतात.
ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनीही आपल्या सौजन्यपूर्ण वागण्या-बोलण्याने मुंबईकरांवर जादू केली होती. ओबामांनी त्यांच्या गाण्यावर ताल धरणं ही गोष्ट गायक श्रीकांत नारायण साठी अनमोल ठरली आहे. सगळीकडे हेच कोळी गाणे गुणगुणले जात आहे.



No comments: