कोणत्याही कामकाजाशिवाय नुकतेच पार पडलेले भारतातील हे पहिलेच संसदीय अधिवेशन म्हणजे सत्ताधा-यांचे व विरोधकांचे अपशय सा-या जगाला पाहायला मिळालेले नाटक होते.आपल्या देशाच्या संसदेच्या इतिहासात असे अधिवेशन प्रथमच घटले आहे.जगातील कोणत्याच देशात असे कामकाजाविना अधिवेशन होत नसतील.जनतेच्या पैशावर गेले २३ दिवस ही मडंळी फक्त राजकारण करीत होते.कोणालाच याबद्द्ल स्वारश्य दिसत नव्हते.एकानीही या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही.सत्ताधारी व विरोधक आपापली जबाबदारी टाळताना दिसले.यानी लोकशाहीचे धिडंवडे काढले.जनतेने याना देशाच्या सवोर्च्च सभागृहात देशहिताच्या दृष्टीने काही साधकबाधक चर्चा करण्यासाठी आणि नवे कायदेकानून बनवण्यासाठी निवडुन दिलेले असते.गोंधळ घालून आंदोलन करण्यासाठी नव्हे.करोडो स्र्पयाचा चुराडा केला तो कसा काय भरुन निघणार? याना जरा तरी लाज वाटत असेल तर यानी या काळातले आपले मानधन स्विकारु नये.याना सर्वाना शिक्षा झाली पाहीजे.एखाद्या कामगाराकडुन चुक झाली किंवा त्याने कामचुकारपणा केला तर त्याला शिक्षा होते.मग काय कारभा-याना का नको? फेब्रुवारीत सुरू होण-या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही असाच गोधंळ घालण्य़ाचा बेत विरोधकांकडुन शिजत आहे.याप्रकाराला कोँणाचे निंयत्रण नाही का? संसदेचे अधिवेशन चालू असते तेव्हा देशभरातील संस्था व संघटनांना आपले म्हणणे योग्य ठिकाणी पोहोचवण्याची संधी असते.तर मग या अशा वांजोट्या अधिवेशनाबद्द्ल सर्व संस्था व संघटन शांत का?मिडीयाच्य ब्रेकींग न्युज का प्रसिध्द होय नाहीत? विचारंवत विरोध दाखवला पाहिजे.संसद आणि विधिमंडळ हे अनुक्रमे देशाचे आणि राज्यांचे लोकशाही पद्धतीतील सवोर्च्च व्यासपीठ मानले जाते. लोकांच्या समस्यांची तड लागावी, जनतेला न्याय मिळावा आणि जनकल्याणाचे कायदे बनवले जावेत, अशी या सभागृहांकडून अपेक्षा असते. प्रत्यक्षात गोंधळ, हमरीतुमरी, आरोपप्रत्यारोप याचेच दर्शन संसद किंवा विधिमंडळाचा वेळ व पैसा वाया घालविणे याना शोभा देते का?प्रश्नाच्या मुळाशी न जाता केवळ राजकीय चर्चा न करता आपली मागणीच हट्ट करायचा ही संसदेत आता पद्धतच झाली आहे.गेल्या काही वर्षांत कोणत्याही गोंधळाशिवाय अधिवेशन पार पडले, असे उदाहरण नाही. निषेध नोंदवणे, हे संसदीय आयुध आहे. त्यामुळेच स्थगन प्रस्ताव, कधी सभात्याग, हरकतीचे व औचित्याचे मुद्दे उपस्थित करणे आदी बाबी संसदीय राजमार्गावरीलच ठरतात, पण इतके करून स्वस्थ बसणे व अजेंड्यावरील कामकाज सुरळीत चालवणे आमच्या खासदार मंडळींना मान्य नाही. त्यामुळेच प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर व दरम्यान असे काही मुद्दे उपस्थित होतात की, ज्यामुळे काहींना आपले बाहुबल आणि काहींना आपल्या स्वरयंत्राची ताकद दाखवण्याची संधी मिळते. याबद्दल अनेकांनी टीका केली. पण संसदपटूंच्या वर्तणुकीत बदल होण्याची सूतराम शक्यता नाही.
हे बिनकामकाजाचे अधिवेशन खुप लाबंले पण यापुर्वीच्या अधिवेशनांचे दिवस सर्वात कमी करीत नेणे हा कामचुकारपणाचा हा कळस म्हणावा लागेल. जनहिताचा विचार करुन राजकारण बाजुला सारुन संसदेचे कामकाज चागंल्या रितीने पार पडण्याचे प्रयत्न सताधारी व विरोधकानी केल्यास जनतेची खुप मोठी कामे होतील.
हे बिनकामकाजाचे अधिवेशन खुप लाबंले पण यापुर्वीच्या अधिवेशनांचे दिवस सर्वात कमी करीत नेणे हा कामचुकारपणाचा हा कळस म्हणावा लागेल. जनहिताचा विचार करुन राजकारण बाजुला सारुन संसदेचे कामकाज चागंल्या रितीने पार पडण्याचे प्रयत्न सताधारी व विरोधकानी केल्यास जनतेची खुप मोठी कामे होतील.
No comments:
Post a Comment