Sunday, December 12, 2010

जुलियन अँसेन्ज बनायला आवडेल.

देशातला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी विकिलिक्सिचा 'ज्युलियन अँसेन्ज'  होण्यास कधीही आवडेल.पण त्याचे खाजगी आयुष्य सोडुन त्यांच्यासारखे आपल्या सरकारच्या कारभारातील भ्रष्टाचाराची गुप्त माहीती जनतेसमोर आणण्याची लोकसेवा गुन्हा असुन देखील करायला आवडेल.ससंदेचे रक्षणकर्ते आपले राजकीय नेते आपल्या अधिकारात भ्रष्टाचारासारखे मोठे गुन्हे करुन जनेतेचा पैसा खातात.यासाठीच जनतेचा पैसा खाण्या-या नेत्यांच्या कारस्थानांची गुप्त माहीती हँक करुन केवढाही मोठा गुन्हा असला तरी त्यांची कृत्ये जाहीर करण्यास खुप आवडेल.त्या नेत्यांची जितकी माहीती बाहेर येत राहील तितके सरकार,राजकिय पक्ष व नेते दबावाखाली राहतील व सरकारला अधिक पारदर्शी रहावे लागेल.मत्र्यांची कट कारस्थाने,भ्रष्टाचार जनतेच्या निदर्शनात आणल्यास जनताही सर्तक राहुन त्याला विरोध करेल.यानी लोकशाहीचे पालन होईल.असे होत राहीले तर त्यांची काळे धंदे बंद झाल्याने सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र येउन या विकीलिक्सच्या विरोधात मोठ्या शिक्षेचा ठराव मजुंर करतील.कोणता नेता दहशतवाद्दांना माहीती पुरवून मदत करतो,देशाच्या विरोधात कोणता नेता काम करतो व कोणता सरकारी करभारात भ्र्ष्टाचार करतो असली गुप्त माहीती गुप्तपणे काढुन त्या गोष्टीची लक्तरे जनतेसमोर मांडणारी 'विकिलिक्स' सारखी संस्था असावी.तरच नेत्यांवर वचक बसेल व या मडंळीत काही सुधारणा अपेक्षित राहील.सरकारी गुपिते बाहेर पडु लागल्यास सरकारलाही आपली माहीती अधिक गुप्त ठेवण्याचे नवे प्रकार शोधावे लागतील.


No comments: