काही काम असल्याने रोजच्यापेक्षा आज लवकर आँफिसला निघालो.मुबंईतला रेल्वेचा प्रवास लवकर केल्यास गर्दी कमी असते.'परेल' स्टेशनातून गाडी सुटताना एक आंधळा भिकारी गाडीत चढला.त्याने बासरी काढुन बासरीवर हिंदी गाणी वाजवू लागला.काही लोकांनी त्याला पैसे दिले.तर काहीनी त्याला पुढे जाण्यास जागा दिली.तो आंधळा चांगली गाणी वाजवित गर्दीतून बरोबर वाट काढीत लोकाना मदत करण्यास आव्हान करीत होता.पण तोडांने भिक मागत नसला तरीही लोक त्याला पैसे देत होते.मुक आव्हानाला प्रतिसाद मिळत होता.थोडेसे पैसे जमा करुन तो पुढच्या स्टेशनला उतरुन पुढ्च्या ड्ब्यात गेला.कानावर त्याच्या बासरीचे सुर गुंजत राहीले.
पुढच्याच 'भायखळा' स्टेशनात एक छक्का गाडीत चढ्ला.तो रंगाने काळा असुन चागंला मेकअप केलेला होता.असे खुप भिकारी गाडीत येत असतात.याच्याकडे सर्वजण बधत होते.त्याने बसलेल्या व उभे असलेल्या सगळ्यांच्या डोक्यावर हात लावण्यास सुरुवात केली.हात लावत पुढे जाउन परत पाठीमागे येउन पैसे मागण्यास सुरुवात केली.नेहमीच्या प्रवाश्याना हे नवीन नव्हते.पण नविन प्रवाश्याना हा नवा अनुभव होता.ह्या हात लावुन ह्क्काने भिक मागणा-या छक्क्याला लोकांनी पटापट पैसे देत होते.त्या गरीब आंधळ्या भिका-याला जास्त कोणी पैसे दिले नाही.पण या छक्क्याला खुप भिक मिळाली.हा छक्का रोज काही तासात हजारो पैसे जमा करतो ही माहीती बाजुच्या प्रवाशानी दिली.लोकांची प्रवृती पाहायला मिळाली.आपली साडेसाती दुर व्हावी व दिवस चांगला जावा तर काहीनी त्याला धाबरुन पैसे दिले.तो एकदम खुष होउन लहान मुलासारखा उड्या मारीत पळला.
भिक देण्याचा आणि कोणाला द्यायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे.पण गरीब व दुबळ्या मदत करणे योग्य वाटते.
1 comment:
Nice article. I fully agree with you.
AA
Post a Comment