एटीएम ही मशीन ग्राहकांना व बँकेला खुपच सोयीची ठरली आहे.केव्हाही पैसे काढु शकतो ही मोठी सोयी या मशिनने ग्राहकाना दिली आहे. सध्या देशातील बँकांमध्ये होणा-या पैशाच्या हस्तांतराच्या सर्व व्यवहारांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी व्यवहार बँक शाखांद्वारे होत आहेत. इतर व्यवहार बँकांच्या 'ऑटोमेटेड टेलर मशिन्स'च्या ('एटीएम') माध्यमातून होतात. 'एटीएम'कडे अजूनही बरेच बँक ग्राहक केवळ पैसे काढण्यासाठी, चेक जमा करण्यासाठी, खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी वापरण्याचेच यंत्र म्हणूनच पाहत आहेत.भारतीय रिर्झव्ह बँकेने कोणत्याही बँकेच्या 'एटीएम'चा वापर नि:शुल्क केल्यानंतर देशात जणू 'एटीएम क्रांती'च घडली आणि 'एटीएम'चा वापर झपाट्याने वाढला. रोख रक्कम काढणे, बँक खात्यातील शिलकीची माहिती मिळविणे, आपली 'एटीएम पिन' बदलणे, आपण दिलेल्या, आपल्या खात्यात भरलेल्या चेक्सच्या रकमा वजा झाल्या, जमा झाल्या की नाही ते पाहणे याव्यतिरिक्त चेकबुकसाठी, 'अकाउंट स्टेटमेंट'साठी विनंती सादर करणे हीही कामे 'एटीएम'च्या माध्यमातून करता येतात. बँक आणि 'एटीएम मशिन'च्या स्वरूपानुसार 'एटीएम'मध्ये रोख रक्कमही (कॅश) भरता येते. अगदी पंधरा वर्षांपूर्वी सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी नवलाईची गोष्ट असलेल्या 'ऑटोमेटेड टेलर मशिन' अर्थात 'एटीएम' चा देशात झपाट्याने प्रसार झाला असून , भारतीयांकडून केल्या जाणा-या 'एटीएम' वापराने याबाबतच्या जागतिक सरासरीची पातळी गाठली आहे.एटीएम सेवेकडे वाढणारा ग्राहकांचा कल पाहून सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँका ग्राहकांना अधिकधिक एटीएम केंद उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न करत आहेत. देशातील बँका आपल्या 'एटीएम'चे जाळे विस्तारण्यासाठी वाढत्या प्रणामावर बाहेरून अन्य कंपन्यांकडून हे काम करवून घेण्यावर ('आउटसोर्सिंग') भर देत आहेत. त्यामुळे 'पेमेण्ट' सेवा उद्योगातील बहुराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान सेवा कंपन्यांचा भारतात प्रवेश झाला असून,त्यांची 'एटीएम नेटवर्क'मधील गुंतवणूक वाढत आहे. 'एटीएम'साठी मोठी गुंतवणूक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची सज्जता करावी लागते. त्यामुळे मोठी वित्तीय गुंतवणूक करु शकणा-या, आथिर्क दृष्ट्या प्रबळ अशा 'पेमेण्ट सव्हिर्सेस कंपनी'ला 'एटीएम' सेवेकरिता पार्टनर बनविणे हे बँकांना सोयीचे ठरत आहे.
एटीएम या एका चागंल्या सोयीचा काहीजण वाईट कारणासाठी वापर करतात याचे वाईट वाटते.
'एटीएम'मधून अनेक बँक खात्यांमध्ये ५० हजारांहून कमी रक्कमा जमा करण्यात आल्या त्या रक्कमा संबंधितांनी नंतर 'एटीएम' च्या माध्यमातूनच काढून घेतल्या. देशात किंवा देशाबाहेरून 'एटीएम'द्वारे संबंधितांच्या अकाउंट्समध्ये पैसे भरले जातात आणि नंतर संबंधित एक किंवा अनेक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणच्या 'एटीएम्स' मधून हे पैसे काढून घेतात. असले व्यवहार दहशतीवादी संघटना कारवायांसाठी लागणारा पैसा आपल्या देशात आणत आहेत.देशातील भष्टाचारी नेते, नोकरशहा त्यांच्याकडील काळा पैसा दडवून तो पांढरा करण्याच्या 'उद्योगा' साठी ('मनी लॉण्डरिंग') बँकांच्या 'एटीएम' वाढत्या प्रमाणावर वापर करीत आहेत. गुप्तचर संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांनी 'एटीएम'च्या माध्यमातून केल्या जात असलेल्या संशयास्पद व्यवहारांचा शोध घेत आहेत.संशयास्पद व्यवहार करणारी बँक खाती लक्षात येताच ती तात्काळ गोठविण्याची कारवाई बँकांकडुन होत आहे. असल्या व्यवहारामुळे आता बँका नवीन नियम काढतील तेव्हा सामान्यांची गैरसोय होईल.
एटीएम या एका चागंल्या सोयीचा काहीजण वाईट कारणासाठी वापर करतात याचे वाईट वाटते.
2 comments:
तुम्ही एक चांगला मुद्दा उपस्थित केला.
हवालाचे पैसे भारतात आणण्याचे प्रयन्त सुरु होतील ह्या भीतीने कदाचित दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे पुढारी मंडळी आपला पैसा (वस्तुतः आपला पैसा) भारतात आणत असावेत.
एकीकडे खातेदारांची कसून तपासणी करावी आणि दुसरीकडे हजारावरील रोख व्यवहार बँकांमार्फत करण्याची सक्ती करावी. ह्याने मुक्तपणे फिरणाऱ्या काळ्या पैशावर बंधने येतील. पण स्वतःचा पैसा पांढरा झाल्याशिवाय पुढारी मंडळी अर्थ व्यवस्थेत सुधारणा करणार नाहीत. असो.
बँकांनी लवकरच रोख व्यवहार बंद केल्यास काळा पैसा बाहेर येईल.
Post a Comment