२६/११ दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष पुर्ण होत असल्याने मुबंईत श्रद्धाजंली कार्यक्रम होत आहेत. देशाच्या जनतेचे रक्षण करताना प्राणार्पण केल्याने हुतात्म्यांचे स्मरण करुन दुस-या दिवशी विसरुन जाणा-या आम्हा देशाबाधंवाना क्षमा करावी.त्यानी लढताना प्राणार्पण केले नसते तर आणखी कीती जिवितहानी झाली असती?एका दहशतवादीला जिवंत पकडण्यात यश आले तेही यांच्या शौर्यामुळे हे शक्य झाले आहे. कसाबला दोन वर्षात फाशी देउ शकलो नाही.त्याला पोसण्यासाठी करोडो रुपये खर्च होत आहेत पण या हुतात्म्यांच्या कुटुंबीयाना सरकारने जाहीर केलेली मदत अजुनही मिळत नाही.देशाची एकात्मता आणि सुरक्षा यासाठीच उपरोक्त हुतात्म्यांनी आपले जीवन,सर्वस्व पणाला लावले होते.त्या हुतात्म्यांनी आपल्याकडुन हीच अपेक्षा बाळगली असेल ? वर्षातल्या २६/११ या दिवशी श्रध्दांजलीचे सोपस्कार हवा म्हणुन त्यांनी आत्मसर्मपण केले होते का? श्रध्दांजली वाहण्य़ाचा अधिकार तरी या नेत्याना कोणी दिला आहे? एकीकडे श्रध्दांजली वाहायाची व दुसरीकडे खुलेआम घोटाळे व गैरव्यवहार करायचे.हे कसले जनतेची कामे करणार? हे फक्त स्वत:ची पोटे भरायची व भावी पिढीसाठी तरतुद करायची ह्या हुतात्म्यांच्या विटंबनेला आपणही अबोल समंती देत आहोत.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब,कोण तो कैदी,आरामात राहातो.त्याला सर्व पुरवले जाते की नाही हे पाहण्यास आमचे गृहमंत्री व विरोधी पक्षनेते कसाबला तुरुंगात भेटत आहेत.पण गेल्या दोन वर्षात हुतात्म्याना भेटण्यास हे मंत्री व नेते कधी गेले नाहीत. नेते मडंळी स्वत:साठी झेड सुरक्षा आणि जनतेची काय करायची आहे सुरक्षा.
आपला समाज बधीर व संवेदनाशुन्य बनला आहे त्याची वेगळी साक्ष देण्याची गरज नाही.यामुळेच या हुतात्म्यांची क्षमा मागितली पाहिजे. आपण शहिदांचे बलिदान व्यर्थ होता कामा नये. देशातला
दहशतवाद जर समुळ काढला तरच या हुतात्म्यांना श्रध्दाजंली ठरेल.
1 comment:
आपला समाज बधीर व संवेदनाशुन्य बनला आहे त्याची वेगळी साक्ष देण्याची गरज नाही.
एकदम खरय काका... :(
Post a Comment