देशात 'भ्रष्टाचार' या महाभयंकर रोगाची साथ पसरली आहे.तसा हा रोग फार जुना आहे.पण हल्ली या रोगाची लागण झाल्याने बरेच बळी पडत आहेत.संसर्गात आल्याआल्या सत्ताधा-यांमघ्ये ह्या रोगाचा प्रसार जोरात होतो.ह्या रोगाचे जंतु सामान्याना चावत नाही. हे जंतु फक्त मंत्र्याना हेरुन त्याना चावुन या रोगाचे रोगी बनवितात. या रोगावर जालिम उपाय सापडत नसल्याने व संसर्गामुळे हा रोग वा-यासारखा पसरत आहे.या रोगावर लस शोधुन ती मंत्र्याना मंत्रीपदाची शपथ घेताना टोचली तर थोड्य़ाप्रमाणात हा रोग आटोक्यात येउ शकतो. देशातील सत्ताधारी व विरोधक हे संस्थानिक कुठल्यातरी घोटाळ्यात अडकले आहेत.त्यानी केलेले घोटाळे जनतेसमोर येत आहेत.असे आणखी किती घोटाळे उजेडात येणार आहेत.हे घोटाळे हि मडंळी शासकीय अधिका-याना सोबत घेउन करतात.हे अधिकारीही याला विरोध न करता त्यांच्यात सामिल होतात.या मंत्र्याना एकमेकांचे घोटाळे माहीत असतात पण ते जाहीर करीत नाहीत.याचा उपयोग ही मडंळी राजकारणातल्या डावपेचासाठी वापर करतात.राजकारणातील आपल्या प्रवासात एकदा राजकारणी आवडा येत असेल तर त्याला त्यानी केलेल्या घोटाळ्यात अडकवून आपला राजकारणातला मार्ग मोकळा करण्याची रणनीती हल्लीच्या राजकारणी आखत असल्यानेच मोठे घोटाळे बाहेर पडत आहेत.हेच बेडर राजकारण्यांनी आपली घराणेशाही सत्तेत आणून भावी पिढ्यांची तरतूद केली जात असल्याने आपल्या देशाची सामाजिक व अर्थव्यवस्था कोलमडेल याची भिती सामान्यांना वाटत आहे. पण परीस्थिती निवळली की हेच लोक पुन्हा सत्ता ह्स्तगत करतात.भ्रष्टाचा-याना मोठी शिक्षा होत नाही.घोटाळ्याना मदत करणा-याना अधिका-यानाही हे मडंळी अभय देतात व त्यानाही शिक्षा होत नाही. छोट्या छोट्या गुन्हाना मोठ्या शिक्षा होतात पण याना फक्त पदावरुन पायउतार करतात. या लोकांना राजकीय जीवनातून हद्दपार करता येईल का? त्यासाठी कायद्यात बदल करावे लागतील का? त्यांना मोठी शिक्षा व्हायलाच हवी ही अशी आमजनतेची इच्छा आहे.ती झाली तरच हे भ्रष्टाचार बंद होतील.आथिर्क वा
चारित्र्याचा भ्रष्टाचार हा लोकप्रतिनिधींसाठी अक्षम्य गुन्हा ठरविला पाहिजे.मंत्री काय, खासदार काय आणि आमदार काय; आरोप झाल्यानंतर स्वत:हून पदावरून दूर होत नाहीत. तर जनक्षोभामुळे पक्षश्रेष्ठींना अनिच्छेने त्यांना हाकलावे लागत आहे. स्वहित जपण्यासाठी जेव्हा आपलेच हात अवैध लाच देण्यासाठी पुढे जातात तेव्हा भ्रष्टाचाराचे पहिले गुन्हेगार आपणच असतो. आपल्या वैयक्तिक फायद्यापेक्षा देश मोठा आहे याची जाण ठेवून वागणे शिक्षेहूनही कठीण असले तरी भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रापासून देशाला वाचविण्यासाठी दुसरा पर्याय नाही. कितीजणांना शिक्षा केली यापेक्षा कितीजणांना गुन्हा करण्यापासून परावृत्त केले यातच देशाचा मोठेपणा आहे.निवडणूक आयोग हा जसा निवडणुकीची कामे स्वतंत्र व नि:पक्षपातीपणे करतो. तसेच भ्रष्टाचारासाठीही नविन आयोग नेमावा. भ्रष्टाचार निर्मूलनचौकशीचे काम 'भ्रष्टाचार निर्मूलन आयोग' ह्या स्वतंत्र यंत्रणेने केल्यास ह्या भ्रष्टाचार नियंत्रण ठेवता येईल. आपल्या देशात राजकारणातील कायदेशीर अस्त करण्याच्या कायद्याची आज नितांत गरज आहे.
No comments:
Post a Comment