Wednesday, January 12, 2011

'सर’ सचिन तेंडुलकर केव्हा?

म्हैसूर विद्यापीठाच्या वतीने त्याला ' डॉक्टरेट ' ही मानाची पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे.सचिन तेंडुलकरला काही महिन्यांपूर्वीच भारतीय वायूदलाने ऑनररी ग्रुप कॅप्टन हे मानाचे पद देऊन गौरवले होते. ग्रुप कॅप्टन सचिन लवकरच सुखोई या लढाऊ विमानातून अवकाशात भरारी घेणार आहे. त्यापाठोपाठ आता सचिनला डॉक्टरेट मिळणार असल्याने, डॉ. सचिन रमेश तेंडुलकर अशी सचिनची नवी ओळख जगाला होणार आहे.

 ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी क्रिकेटमधील योगदानाबद्दल सचिनला 'सर' ही पदवी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.१९९४मध्ये अर्जुन पुरस्काराने तर १९९९मध्ये पद्मश्रीने सचिनला गौरवण्यात आले होते. तर १९९८मध्ये या मास्टर ब्लास्टरला पहिलावहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही मिळाला होता. १९९७मध्ये सचिनची विस्डेन क्रिकेटियर म्हणून निवड झाली होती तर नोव्हेंबर २००६च्या 'टाइम' मासिकाने सचिनची आशियाई हिरोंमध्ये निवड केलेली आहे. 

पण क्रिक़ेट जगतातील सर्वात मानाची पदवी 'सर' कोणत्याही  भारतीयाला मिळविता  आली नाही.'सर'ही पदवी मिळण्यास  सचिनला आणखी  किती   रेकाँर्ड  करावे  लागणार? सचिनला  क्रिकेटच्या   मैदानात विश्वविक्रमांचे
कोणते मनोरे रचल्यानतंर जागतिक क्रिकेट मडंळ त्याला 'सर'ही  पदवी देणार? सचिनला 'सर'ही पदवी देउन गैरविल्यास जगाला  त्याची नवी ओळख होईल.प्रत्येक भारतीयाला सचिनला 'सर' ही पदवी मिळावी असे वाटते. आपल्या फलंदाजीने सर डॉन ब्रॅडमन यांचे मन जिंकणा-या भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लाडक्या  सचिन तेंडुलकरला ‘ सर ’ ही पदवी मिळाली आणि तो ‘ सर ’ डॉन ब्रॅडमन आणि  ‘ सर ’ गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत जाऊन बसला तर कोणाला आवडणार नाही. भारतीयांसाठी तर ही अभिमानाची बाब ठरेल.

भारतरत्न या मानाच्या पुरस्कारासह 'सर' ही मानाची पदवी सचिनला दिल्यास भारतीय क्रीकेटप्रेमी आनंदी होतील.


5 comments:

Vinay said...

तेंडुलकरला 'सर' पदवी देण्याची अफवा ह्या आधी सुद्धा उठली आहे. पण भारतात कुठलीही पदवी लावता येत नाही (डिफेन्स, न्यायमूर्ती सोडून) म्हणून सचीनने ही पदवी घेण्यात काहीही फायदा नाही.

आणि दुसरं म्हणजे, अनेक लोकं 'सर' पदवी म्हणजे ब्रिटीश सामराज्याच्या गुलामीची आठवण म्हणून बघतात. सचीन महान आहे, ह्या साठी गोर्‍यांच्या उपाधीची गरज आहे का, असा सवाल अनेक जणांना येतो. खरं सांगायचं झालं तर सचीनने ही पदवी स्वीकारू नये. पण त्याला भारत सरकारने भारत रत्न ची पदवी नक्कीच द्यावी अशी माझी इच्छा आहे.

नागेश देशपांडे said...

छान आहे पोस्ट...

मी सुद्धा त्यादिवसाची वाट बघत आहे. ज्या दिवशी सचिनला, "सर" ही पदवी देण्यात येईल...


http://blogmajha.blogspot.com

हेरंब said...

>> पण क्रिक़ेट जगतातील सर्वात मानाची पदवी 'सर' कोणत्याही भारतीयाला मिळविता आली नाही.<<

सर ही क्रिक़ेट जगतातील सर्वात मानाची पदवी नाही. ती क्रिकेटविश्वाच्या बाहेरील लोकांनाही मिळू शकते. (आपल्या रविंद्रनाथ टागोरांनी इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी नाकारली होती आठवतंय?)

दुसरा मुद्दा म्हणजे परकीयांच्या सर या पदवीचा आपण एवढा उदोउदो करण्याचं मला तरी काही कारण वाटत नाही. ती मिळाली काय किंवा न मिळाली काय सचिनच्या असीम मोठेपणात काहीच फरक पडत नाही. हो कदाचित सर या पदवीचा गौरव मात्र नक्की होईल !!

Amol said...

सर ही पदवी (British Knighthood)- "राणी" चे राज्य मानणार्‍या देशांतील लोकांना हे नाईटहूड दिले जाते. म्हणूनच ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, वेस्ट इंडिज मधल्या खेळाडूंना ते मिळाले आहे. क्रिकेटजगतातील सर्वात मानाची पदवी 'सर' तर नाहीच पण इतरही कोणती नाही. असा कोणताच पदवीचा क्रम नाही.

सचिन याच्या कधीच पलिकडे गेलेला आहे. आणि जागतिक क्रिकेटमधले भारताचे स्थान आता इंग्लंड पेक्षा वरचे आहे. तेव्हा त्याला असल्या पदवीची गरज नाही. दुसरे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या कोणत्याही खेळाडूला हे दिलेले नसल्याने उगाच गावसकर, कपिल सारख्या लोकांना कमी लेखले जाईल.

भारतरत्न जरूर मिळावे त्याला. कदाचित निवृत्तीनंतर देतील. त्यामुळे लौकर मिळू नये असे एका अर्थाने म्हणावेसे वाटते :)

Ameya Girolla said...
This comment has been removed by the author.