Friday, January 7, 2011

सेलिब्रिटींचे ऐवढे लाड का?

  विविध जाहिराती तसेच अनेक कंपन्यांचे ब्रँड अँबेसिडर असलेल्या या मंडळींनी कंपन्यांशी केलेल्या करारांवर स्टँप ड्युटी भरलेली नसल्याने सचिन तेंडुलकरसह बॉलिवूडमधील सहा सेलिब्रिटींना थकित स्टँप ड्युटी तातडीने भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.हे सेलिब्रिटी करोडी रुपयांच्या जाहीरातीचे करार कंपन्यांशी करतात आणि छोटिशी स्टँप ड्युटी न भरता त्या कराराची नोदणी कशी केली जाते? हा प्रश्न उभा होतो.ह्या सेलिब्रिटीच्या नांवे मोठ्या रक्क्मेची थकीत स्टँप ड्युटी आहे. ही स्टँप ड्युटी कोणी भरायची असा वाद सेलिब्रिटी आणि कंपन्यांमघ्ये सुरु आहे.
 
करारांची नोदंणी करताना स्टँप ड्युटी नतंर भरण्याची मुभा का दिली जाते? सामान्यांचे करार स्टँप ड्युटी भरल्याशिवाय नोदंणी होत नाही.सामान्याना व सेलिब्रिटीना वेगवेगळा न्याय दिला जात आहे.सरकारी कामात एकाच कामाला वेगवेगळ्या माणसाना वेगवेगळी वागणुक दिली जात आहे. मग या सेलिब्रिटींचे  ऐवढे लाड का? मोठ्या रक्केमेचे करार करतात मग छोट्या रक्कमेची स्टँप ड्युटी भरायला यांच्याकडुन काकु का केली जाते.

 सेलिब्रिटींना थकीत स्टँप ड्युटी दोनदा भरण्याचा दंड करावा.यापुढे स्टॅम्प ड्युटी विभागानी सेलिब्रिटींना अशी वागणुक न देता सामान्यांसारखीच नियमानुसार स्टँप ड्युटी भरण्याची वागणुक दिली गेली पाहीजे.  

No comments: