भ्रष्टाचार,भ्रष्टाचार,भ्रष्टाचार.
सगळीकडे भ्रष्टाचार स्रुरु आहे.भ्रष्टाचाराच्या रोगाने ग्रासलेल्या देशाला वाचवण्यासाठी कठोर मनाने शस्त्रक्रियाच करायला हवी. भ्रष्टाचाराची माहीती देउन तो थांबवला पाहिजे.पकडले जात नाही तोवर 'ऑल इज वेल!' प्रकरण उघडकीस येते, तेव्हाच जनसामान्यांना माहित होते. गवगवा होत राहतो. पण सरकार संबंधितांना सांभाळून घेण्याचाच प्रयत्न करते. घोटाळ्यांचे पोस्टमाटेर्म करण्यापेक्षा, जेव्हा कुठे काही कुजत असते, तेव्हाच त्यावर वार करता येईल का,याचा विचार करायला हवा.
हे सर्व उद्योग पालिका,राज्य व केंद सरकारच्या विविध विभागांत होताना,यंत्रणेतील अनेकांना पाणी कुठे मुरत आहे याची कल्पना असूनही,भ्रष्टाचार पूर्णत्वास पोचण्याआधी ते घोटाळे उघडकीस आणू शकत नाहीत.कर्मचा-यांची बांधिलकी सरकारऐवजी जनतेशी हवी,जनतेचे व्यापक हित जपावयास हवे.नियमांच्या बेडीचा बागुलबुवा दाखवून गुन्हेगारांना मोकळे रान सोडायचे का? जनतेच्या असहायतेचा फायदा सफेद कपड्यातल्या गुंडांना कुठवर घेऊ द्यायचा?
भ्रष्टाचाराला विरोध करत त्याच्या विरुध्द लढण्याची इच्छा बाळगणारे अनेकजण आहेत.लाच-लुचपत,घोटाळे या विषयीची तक्रार नक्की करायाची कुठे आणि कुणावर विश्वास ठेवायचा याची माहीती नसल्याने अनेकवेळा तक्रारी केल्या जात नाहीत.
www.cvc.nic.in ही अशी वेबसाईट आहे.तिथे तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी करता येउ शकतात.केद्रिंय दक्षता आयोगाची ही वेबसाईट असुन त्यावर वरिष्ठ अधिका-यांशी थेट संपर्कही साधता येऊ शकतो.
No comments:
Post a Comment