Saturday, January 1, 2011

मुबंईतले आश्चर्य

              आपल्या  घराला  बाल्कनी  सेल तर  तुम्ही  बाल्कनीत  जाणार  नाहीत  असे  होईल  का?पण   मुबंईत  मंगेशकर कुटुंबीय असे  आहे की जे आपल्या बाल्कनीत केव्हाच दिसत नाहीत.जेव्हा मंगेशकर  कुटुंबीय आपल्या  बाल्कनीत दिसतात तेव्हा तर ते मिडीयाला  एक 'ब्रेकींग न्युज' मिळते. हेच मुबंईतले एक मोठे आश्चर्य ठरते.मुबंईकर लता दिदीच्या दर्शनाची वाट पाहात असतात.
      
    मागे  विजयी  भारतीय  संघाच्या  मिरवणुकीला  शुभेच्छा  देण्यासाठी  लता मंगेशकर बाल्कनीत आल्या होत्या. त्यानतंर काल संध्याकाळी त्या त्यांच्या कँलेंडरचे प्रकाशानला त्यांच्या पेडर रोडवरील'प्रभुकुंज' च्या  बाल्कनीत  आल्या होत्या.त्याना  बाल्कनीत पाहण्यासाठी  गर्दी  झाली  होती. ही  बातमी  टी.व्ही  व   वृतपत्रानी  प्रकाशीत  केली आहे.या वर्षीच्या कँलेडंरमघ्ये त्या प्रसिध्द संगीतकरासह त्यांचे फ़ोटो आहेत.तर पुढ्च्या वर्षीच्या कँलेडंरमघ्ये त्या प्रसिध्द गायकांसह फोटो येणार आहेत. 

              भारतरत्न लता मंगेशकर ह्या बाल्कनीत आल्यातर त्याना पाहण्यासाठी लोक जमतात.वाहतुक थांबते व मोठा गोधंळ होतो.लोकाना त्रास होउ नये म्हणुन त्या बाल्कनीत येत नाहीत.

No comments: