Tuesday, January 25, 2011

राष्ट्रीय मतदार दिन

भारत निवडणूक आयोगास येत्या २५ जानेवारी रोजी ६० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमीत्त जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रावर मतदारांमध्ये जनजागृती म्हणून नवीन मतदार होणा-या युवकांचा गौरव करून त्यांना प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.
'लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली सत्ता म्हणजे लोकशाही'.या लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे काम करणा-या मतदारांमध्ये मात्र जागृतीची गरज आहे. मतदार मतदानामध्ये निरुत्साह दाखवून मतदानाची टक्केवारी वाखाणण्याजोगी करीत नाहीत.
मतदाराचे अधिकार काय, मतदान हे एक त्याच्या हातातील कशाप्रकारचे महत्त्वाचे शस्त्र आहे, याबाबत पुसटशीही माहिती दिसली नाही. त्यामुळे केंद्र शासनाने उद्या २५ जानेवारी हा दिवस प्रत्येक वर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. 
मतदान करण्याची जागृतीची ही एक मोहीम आहे.नाव नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.देशाची आणि राज्याची सत्ता ठरविताना मतदार निरुत्साह दाखवितात त्याना त्याच्या हक्काची जागृती करण्याची योजना आहे.
असे मतदार दिन करुन  साजरे मतदानची टक्केवारी वाढेल का?शिक्षिताना मतदानाचे महत्व सांगण्याची गरज जास्त आहे.



 
 

 

No comments: