अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारण्याची हिंमत केरोसीन भेसळखोराना कोठुन व कशी आली? अशाप्रकारचे टोकाचे क्रौर्य करण्य़ाचे धाडस माफियांच्या या टोळक्याला सत्ताधारी राजकारण्यांच्या पाठिंबा मिळत असल्याचा अंदाज पोलीसाना आहे.सरकारी अधिका-यावर असा हल्ला करण्याची हिमंत दाखविताना अनेकदा विचार केला जात होता. या टोळ्यानी इतरांना दहशत बसावी व भविष्यात कोणी त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना अटकाव करण्याचा विचारही मनात आणू नये म्हणुन असे धाडस दाखवत आहेत.
सत्ताधारी पुढा-यांशी साटेलोटे असल्याने त्याना पोलीसांची भिती वाटत नसल्याने या टोळ्या बिनधास्त झाल्या आहेत. मोठ मोठ्या माफिया गँग पोलीसांच्या भितीने सरकारी अधिका-यांशी अशाप्रकारचे वर्तन करणे टाळत होत्या पण त्या गँगच सत्ताधा-यांच्या पाठिब्याच्या जोरावर दहशत पसरवत आहेत.
तेल,वाळु व दुधभेसळ माफीयांच्या कारवाया आता पोलिसांच्या नियंत्रणात राहिल्या नाही.सत्ताधा-यानी या माफियाने पोसले त्यानीच त्याना अडचणीत आणले आहे.दुस-याच्या मदतीने भेसळ करणारे खरे गुन्हेगार आहेत त्याना शोधुन काढणे सरकारला आव्हान आहे.
कायद्याला पळवाटा असल्याने या मडंळीना न्यायव्यवस्था व्यवस्थित मँनेज करता येतात.यामुळेच सामान्य जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे.या कारवायांवर कायदे केलेले आहेत पण अंमलबजावनी होत नाही.कायदा हा गुन्हेगारांना वेळ काढण्याचे साधन व काही महिन्यानतंर राजरोसपणे फिरण्याचे स्वातंत्र्य देते.कुठल्याही खटल्य़ात दोषीला कठोर शिक्षा होत नाही.अशा या न्यायव्यवस्थेतेने गुन्हेगाराना गुन्हे करण्याचे धाडस दिले आहे.
मोठे गुन्हे करताना गुन्हेगारास धाडस कोठुन मिळते त्याचा शोध घेतला नाही तर यापेक्षा भयानक कारवाया येत्या काळात होतील.
No comments:
Post a Comment