Sunday, February 6, 2011

न्याय मिळावा.

मुंबईतल्या ताज हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात एकतीस वर्षीय मेजर संदीप  उन्नीकृष्णन यांना वीरगती प्राप्त  झाली.   हॉटेल ताजमध्ये  अतिरेक्यांविरुद्धच्या   कमांडो ऑपरेशनमध्ये  मेजर  संदीप  उन्नीकृष्णन शहीद
झाले होते. मूळचे केरळचे असलेले मेजर संदीप यांच्या पार्थिवावर  बंगळुरुमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री  येडीयुरप्पा यांच्यासह कर्नाटकचे अनेक मंत्री त्यावेळी अंत्ययात्रेत  सहभागी झाले होते. परंतु केरळ सरकारचा कुणीही मंत्री वा सरकारी अधिकारी  अंत्ययात्रेत सहभागी झाला नव्हता. त्यामुळे केरळ सरकारविरुद्ध संतापाचा  भडका उडाला होता. याबद्दल जोरदार टीकेची झोड उठली होती.प्रचंड  संतापलेल्या संदीपच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांना घरात पायही ठेवू दिले  नाही. कुणाही राजकारण्याने माझ्या घरात न घेता त्यांच्यावर रागावले होते.  
मुंबई ताज हल्ल्यातील शहिदांच्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात वेळकाढूपणा  केला जात असल्याचा निषेध म्हणून संसदेसमोरील विजय चौकात आत्मदहन करणारे मुंबई हल्ल्यातील शहीद एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे काका  के. मोहनन यांचा मृत्यू झाला. 

मेजर संदीप उन्नीकृष्णनवर गोळी झाडणा-या  दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी,अशी त्यांची मनापासून इच्छा होती. या ह्ल्ल्यातील एका आरोपीला पकडण्यात पोलीसाना यश आले पण त्याच्या  चौकशीमघ्ये त्याला सरकारी पाहुणाचार दिला जात आहे.याबद्द्ल या हल्ल्यात  शहिद झालेल्यांच्या आप्ताना संताप होत आहे.या हल्ल्यात शहिद झालेल्यांना न्याय  केव्हा  मिळेल? की सरकार आणखी आत्मदहन करण्या-यांची वाट पाहत आहे.या अशा  सरकारच्या अविश्वासू कारभारामुळे यापुढे ह्ल्ल्याला सामोरे जाण्यास कोणीच   पुढाकार घेणार नाही. 'दहशतवाद्यांना लवलरात लवकर कठोर शिक्षा व्हावी'  यासाठी जनतेने सरकारावर दबाव टाकला पाहिजे.घोटाळ्यात रुतलेल्या सरकारला  या कारवाईसाठी वेळ आहे का? आर्थिक  मदत न घेणा-या या शहिदांच्या आप्ताना न्याय मिळ्वून द्यावा.

No comments: