Sunday, February 27, 2011

कचरा

न उपयोगाची वस्तू म्हणजे कचरा.नको असलेल्या वस्तु.
दिसणारा कचरा व न दिसणारा कचरा,उपयोगी तर बिनउपयोगी कचरा.
स्वच्छता राखण्य़ासाठी घरात कचरा ठेवला जात नाही.
प्राणी,प्रक्षी,झाडे,मनुष्यप्राणी,कारखाने,शहरे,गावे कचरा करीत आहेत.मनुष्यप्राणी जास्त कचरा करतो व कोठेही टाकतो.
सगळीकडे कचरा.घरात,दारात,स्टेशनात,कारखान्यात तर प्रत्येकाच्या मनात कचरा. कच-यावर खुप जण जगतात.प्राणी,पक्षी तर मनुष्य प्राणीही कच-यावर जगत आहे. 
मनुष्याच्या मनातील कचरा बाहेर काढण्यास सोपे नसते.मन कलुसीत झाली तर ती परत स्वच्छ होण्यास वेळ लागतो.मनुष्याने पृथ्वीवर कचरा केलाच आहे आता चंद्रावरही कचरा टाकला आहे. ऐव्हरेस्ट,अर्टीटीका अशा ठिकाणीही कचरा पडलेला आहे.अंतराळात शास्त्रज्ञांनी गेल्या अनेक वर्षांत पाठविलेल्या वस्तूंचा तेथे कचरा निर्माण झाला आहे. कचरा नेहमीच होत राहतो व सारखा वाढत राहतो.प्रत्येक जण कचरा करत असतो.
संग़णकातही नेहमीच कचरा निर्माण होत राहतो.नको त्या फाईल बनत असतात.त्या काढुन टाकल्या नाही तर संगणकाचा वेग कमी होत राहतो.जगात संगणक आल्यापासुन संगणकाचाही खुप कचरा वाढत आहे. 
कच-यापासून खतनिर्मीती तर वीजनिर्मीती केली जाते.कच-यापासुन काही वस्तूंची पुननिर्मिर्ती केली जाते. कचरा दिवसेदिवस वाढत असल्याने त्याची विलेवाट लावण्याची प्रक्रिया करावी लागते.प्रक्रिया केली नाहीतर कच-याचे डोंगर होत राहतात.महापालिका क्षेत्राचा कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची सोय उपलब्ध केली जाते.कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करणे अपेक्षित असते. वाढत्या लोकसंख्याप्रमाणे कचरा वाढत आहे. हॉस्पिटलचा जैविक कचरा समजून उधड्यावर टाकणे चुकीचे ठरत आहे.पर्यटक प्लॅस्टिकचा कचरा जास्त करतात.शहरातील कचरा काढण्य़ासाठी पालीका मोठा खर्च करते.
कचरा हा कचराच असतो. 
कच-यावर पैसा कमविणारी मडंळी खुप आहेत.
हल्ली इ-कचरा वाढल्याने त्रासाचा ठरत आहे.
ओला-सुका कचरा वेगळा न करताच कचरा डेपोमध्ये गेल्याने त्याची आरोग्याला हानिकारक ठरत आहे. 
कच-यासारखी वागणुक दिल्याने माणसे दुरावाली जातात.त्याने मला कच-यासारखे वागवले अशी कायम ऐकायला येते.
नागरिक आपली वैयक्तिक जबाबदारी समजून कचरा न करण्याचे काम आस्थेने केल्यास एक स्वच्छ सुंदर देश निर्माण होईल.

1 comment:

प्रशांत दा.रेडकर said...

कचराच कचरा चहुकडे.
छान लिहिले आहे. :-)

माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/