Wednesday, March 2, 2011

मुबंईचा पक्षी तांबट

बर्डरेसच्या निमित्तानेच 'मुंबईचा पक्षी'मुंबईत पक्षीमित्रांतर्फे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कर्नाळा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, फणसाड, माहीम नेचर पार्क अशा महामुंबई परिसरातल्या विविध जागी पक्षीप्रेमी पक्ष्यांच्या प्रजातींचा वेध पक्षीमित्र घेतात.मुबंईत चिमण्या व कावळे मोठ्या संख्येने आहेत पण पाहुणे 'रोहित' ऊर्फ फ्लेमिंगो आणि गोड गळ्याचा 'दयाळ' या दोन प्रतिर्स्पध्यांवर 'तांबट'या पक्ष्याने मतदानातून बाजी मारली आहे.वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर दिसणा-या या 'तांबट'(Coppersmith Barbet)पक्ष्याने अलीकडेच मुंबईचा पक्षी होण्याचा मान मिळवलाय. 'तांबट' या पक्षाने  आज इलेक्ट्रॉनिक मतदानात सरस ठरलाय.आज तरी तो शहरी भागात आपल्या दृष्टीस पडू शकतो.पूर्वापार रुजविलेले वड, पिंपळ, उंबर यासारखे विशाल वृक्ष हे तांबटाचं घर असते.तांबटाला मात्र घरबांधणीसाठी वेगळी सामग्री लागत नाही, तो वड, पिंपळ अशा झाडांच्या ढोलीत आपलं घर तयार करतो. पण त्याचा निवास असलेल्या वृक्षांची स्थिती काही सरसकट चांगली नाही.वड, पिंपळ आणि अगदी उंबर,जांभळासारखीही झाडं फार कुणी नव्याने लावत नाही.तांबटाच्या डोक्यावर आपण दिलेल्या सरताजाचा संदेश हाच आहे की, अशा झाडांचं संवर्धनही महत्त्वाचं आहे.

 तांबटाने वडाची लालचुटुक फळं खाणं आणि त्याने विष्ठेतून टाकलेल्या बियांमधून पुन्हा झाडं रुजणं हे निसर्गचक्र आहे. एकूणच पक्ष्यांचं अस्तित्व हे परिसरातल्या हिरवाईशी निगडित असतंच. सागरी सृष्टी जिवंत राहिली, तर रोहित पक्ष्यासारखे स्थलांतरित पक्षी इथे येतील.क्रिमझनब्रेस्टेड बाबेर्ट किंवा कॉपरस्मिथ हे इंग्रजी नाव आणि पुकपुक, सोनार, जुकटुक अशा नावांनी ओळखला जाणारा तांबट हा लोकवस्तीशी बऱ्यापैकी जुळवून घेणारा पक्षी आहे. गळ्यावर आणि डोळ्यांभोवती पिवळा रंग, पोटाच्या बाजूला पांढरट रंगांवर हिरव्या रेघा आणि छाती व कपाळावर लाल रंगाची पिसं... असं रंगवर्णन असलेला तांबट हा सुदंर पक्षी फळझाडांवर राहतो. तांब्याच्या भांड्यावर ठोके द्यावे, अशा रीतीने एका विशिष्ट लयीत आवाज ऐकू येत असतो...आपली नजर भिरभिरते,त्याचा व वेध घ्यायला, पण हिरव्या पानांतून आणि वडाच्या लाल फळांतून तसा तो पटकन नजरेस पडत नाही. दिसला की मात्र नेत्रसुखद असंच त्याचं दर्शन असते. आपणही हा सुदंर पक्षी पाहिलात त्याची चचंलता पाहुन आपण आर्श्र्चयचकीत व्हाल.या पक्ष्यांसाठी आपण झाडे जगवली पाहिजेत.

No comments: