परवा एका चँनेलवर 'जंजीर'हा अमिताभ बच्चनचा चित्रपट दाखवला जात होता.मी त्या चित्रपटातील काही भाग पाहिला व जुन्या आठवणी जाग्या झाला.पूर्वी दुरचित्रवाणीच्या विश्वात उपग्रह वाहिन्यांचा संचार होण्यापुर्वी रस्त्यावर पडदा बांधून चित्रपट दाखविले जात असत. त्यामुळे गणेशोत्सव काळातील मनोरजंनाच्या कार्यक्रमातून त्यावेळेचे प्रसिध्द चित्रपट मैदानात किंवा रस्यावर जनतेसाठी दाखवला जात होते.त्यावेळेचा रस्त्यावर मित्रासह चित्रपट पाहण्यास जी मजा वेगळीच होती.तशी मजा आता माँल मध्ये जाउन पैसा देउनही येणार नाही.शहरवजा गावातील एखाद-दुस-या सिनेमागृहात वर्ष भरात जेमतेम एखाद-दुसरा चित्रपट पाहता येणे दुलर्भ असणा-या त्या जमान्यात गणेशोत्सवात घराजवळ दाखविले जाणारे चित्रपट म्हणजे मोठी पर्वणीच होती. चित्रपटशौकिन या संघीचा पुरेपुर लाभ घ्यायचेच. सर्व कुटुंबे हे चित्रपट पाहण्यास खाली उतरत असत.
चित्रपट अर्घ्यावर आल्यावर पाऊस आला तरीही पावसात प्रोजेक्टर छत्री घेऊन चित्रपट दाखविले जायाचे व प्रेक्षक पावसात भिजत हे चित्रपट शांतपणे पाहायचे.घमाल असायची.चित्रपटाची फिल्म तुटली की प्रेक्षक बोंबाबोम करायचे.
रस्त्यावरील चित्रपटांचे त्या काळात मोठे आर्कषण असायचे.जंजीर,कालासोना,कालीचरण,तिसरी मंझील,फकीरा, जाँनी मेरा नाम,खेल खेल मे हे चित्रपट प्रसिध्द होते.ह्या चित्रपटाची जाहीरात सर्व ठीकाणी लावली जात होती. त्या दिवशी दाखविल्या जाणा-या चित्रपटाचे नांव,त्यातील कलांवत आदी तपशील जाहीरातीत लिहिलेला फलक लावला जायाचा. दोन बांबु रोवून त्यावर पडदा लावला जायचा.चित्रपटाची तयारी सुरु झाली की प्रेक्षक जमायला सुरुवात व्हायची. त्या परीसरातील रहिवासी जेवणं वगैरे आटपून मोक्याच्या जागा हेरुन जास्तीत जास्त जागेवर बारदान किंवा आणलेली चटई अथंरत. मग सहकुटुंब ,सखेशेजारी बसुन चित्रपट सुरु होण्याची वाट पाहिली जायची. समाचारचित्र किंवा एखाद-दोन चित्रपटांचे टेलर दाखवून मग शेवटी मुख्य चित्रपट दाखविला जात असे. विघ्नसंतोषी व खोडकर वृत्तीची तरुण गर्दीत उंदीर किंवा बेडुक सोडल्याने मोठा गोधंळ होत असे.दुस-या एरीयातील मुले मागची खुन्नस अशा प्रकारे काढत असत. मुलींच्या छेडाछेडीचे परीणाम मारामारी झाल्याने पोलीस हस्तक्षेप करीत चित्रपट दाखवणे बंद करायचे. काहीवेळाला गर्दीचा फायदा घेत टोळीयुध्द होत असत.मोठ्या पावसामुळे चित्रपट रद्द केले जायचे. पावसामुळे चित्रपट रद्द झाल्याने गणेशोत्सव,नवरात्री,रामनवमी,आंबडेकर जयंती,हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन,शिवजयंती,मडंळाचे वर्धापन दिन आदी प्रसंगी रस्त्यावर चित्रपट दाखविले जात होते.मराठी,हिंदी चित्रपटामध्ये पौराणिक, कौटुबिंक तर नविन प्रेमकहाणी असे चित्रपट असायचे. काही लोकंमध्ये हे रस्त्यावरचे चित्रपट पाह्ण्यस जाणे कमीपणाचे होत असल्याने त्या कुटुंबातील माणसे चित्रपट पाहण्यास येत नसत.
हे चित्रपट पाहण्यास तरुण मडंळी लांबलांब जात होते.रात्री घरी आल्यावर घरात मोठ्याशी भांडणे होत.काळाच्या ओधात हे चित्रपट शहरातून जवळजवळ बंद होत गेले. ज्यानी हे रस्त्यावरचे चित्रपट पाहीले असतील त्याना कधीना कधी त्यावेळेच्या वेगवेगळ्या आठवणी येत असतील.जूने मित्र भेटले की जून्या आठवणीत या रस्त्यावरच्या चित्रपटाची आठवण व गप्पा येतातच.जून्या चित्रपट पाहताना जून्या आठवणी येतातच.
No comments:
Post a Comment