प्रत्येक पहिल्या गोष्टीचे आपल्याला नाविन्य असते. तसेच प्रत्येकाला आपण पहिला असावे नेहमीच
वाटत असते.पहिल्या प्रथम घडणा-या प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे महत्व असते.
पहिला शब्द,पहिले पाऊल,

पहिले प्रेम ,पहिले पत्र, पहिला रुसवा पहिला अबोला,
पहिले वर्ष,पहिले घर,
पहिली गाडी,पहिला वाढदिवस,
पहिली नोकरी ,पहिला पगार
यासारख्या पहिल्या गोष्टी अनुभवताना आपण हरखून जातो.
पहिले नमन,पहिले लक्ष्य,
पहिले पदक,पहिले पाहुणे,
पहिला विक्रम,पहिली भेट,
पहिले लिखाण,शृंगाराच्या मैफिलीतले पहिले वहिले गीत,
पहिले-वहिले अजिंक्यपद,पहिले वाहिले भाषण,

पहिले आव्हान,पहिला पाऊस
अशा असंख्य पहिल्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात घडत असतात.आयुष्यात घडलेल्या अनेक पहिल्या गोष्टी कायम आठवणीत राहतात.आयुष्याच्या या वळणावर एकूणच आनंद,मजा,सुख,दुख,मैत्री अनुभवताना पहिल्या गोष्टीना मोठे मह्त्व येते.याचे अप्रूप मनाला हसरी हुरहुर लावून जाते.म्हणुनच पहिल्यावाहिल्या कितीतरी गोष्टीसाठी आपण जिवाचा आटापिटा करीत असतो. पण काहीच्या आयुष्यात पहिली गोष्ट ही शेवटचीच ठरते.
पहिल्या वहिल्या घडणा-या गोष्टीसाठी प्रत्येकजण आतुर असतो.पण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडते तेव्हा पहिल्या
वेळे ऐवढे महत्व मिळ्त नाही.आपल्या जीवनात पहिली गोष्टही पहिलीच राहते.जसे शर्टाचे पहिले बटन बरोबर लावले तरच पुढची बटने जागेवर बसतात. आयुष्यातही पहिली पायरी व्यवस्थीत चढल्यानतंर पुढच्या पाय-या चढण्यास सोप्या जातात.

No comments:
Post a Comment