Wednesday, April 20, 2011

यंदाही पुरेसा पाऊस

उन्हाळ्याची चाहुल लागताच पावसाचे वेध लागतात.उन्हाळ्यातील उकाडा कधी संपणार आणि पाऊस सुरु होणार असे वाटत असते.उन्हाळा येऊच नये असे वाटते.पण उन्हाळ्याशिवाय पावसाळा येणार नाही.

भारताच्या अर्थकारणाशी निगडित असलेला आणि शेतक-यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणा-या मान्सूनची गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही देशावर कृपादृष्टी असेल आणि तो पुरेसा बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवत देशवासीयांना दिलासा दिला आहे.

पावसाच्या आधीच हवामान खाते आपले अंदाज वर्तवते. काही वेळा हे अंदाज बरोबरही येतात. पण अनेकदा चुकतात.हवामान खाते 'सरासरी' असा अंदाज वर्तवत असले तरी त्यावर विश्वास ठेवण्याची तयारी नसल्याने शेतकरी सध्या सजग झाले आहेत.

देशात सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली ? सर्वाधिक तापमान कुठे होते ? कोणत्या भागात  थंडीचा कडाका जास्त होता, या साऱ्याची माहिती सर्वसामान्यांना होते ज्या वेधशाळेच्या माध्यमातूनच होते ती ' पुणे वेधशाळा ' संपूर्ण देशाचे हवामान अंदाज वर्तवणारी मुख्य वेधशाळा आहे.देशाच्या विविध राज्यांतून येणा-या माहितीची नोंद या वेधशाळेत करण्यात येते. प्रत्येक दिवशी दर तीन तासांनी हवामानाची निरीक्षणे घेतली जातात. पुण्याच्या मुख्य वेधशाळेच्या व्यतिरिक्त देशात वेधशाळेची विभागीय कार्यालये मुंबई,दिल्ली,चेन्नई,कलकत्ता,नागपूर आणि गुवाहाटी या ठिकाणी कार्यरत आहेत.

देशात सरासरी ८९० मिलिमीटर पाऊस होतो. या सरासरीच्या ९८ टक्के पाऊस या वर्षी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १९५१ ते २००० या काळात देशात झालेल्या पावसाची सरासरी ही दीर्घकालीन सरासरी (मानली जाते. या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस यंदा होईल.हा अंदाज वर्तवताना पाच टक्क्यांची त्रुटी गृहीत धरल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र, देशाच्या काही भागांत विशेषत: वायव्य भागात पाऊस तुलनेने कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेतक-यांनाही नेमकी दिशा दर्शवण्याचे काम हवामान खाते सातत्याने करत असते. नित्याच्या हवामानात होणारे बदल कसे आहेत , त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे , याचे नेमके अंदाज वेधशाळेच्या वतीने दिले जात असतात.

हवामानाच्या अंदाजाबाबत नेहमीच टीका सहन करणारे भारतीय हवामान खाते आता मान्सूनचा अचूक अंदाज वर्तवीतात. पावसाच्या आधीच हवामान खाते आपले अंदाज वर्तवते. काही वेळा हे अंदाज बरोबरही येतात. पण अनेकदा चुकतात. हवामान खाते 'सरासरी' असा अंदाज वर्तवत असले तरी त्यावर विश्वास ठेवण्याची तयारी नसल्याने शेतकरी सध्या सजग झाले आहेत.

परिसरातील हवामानाचा अंदाज देणा-या खाजगी संस्थांकडून सेवा घेणा-या शेतकरी, संस्था यांची संख्या मोठी आहे.

हवामानाचा अंदाज वर्तवताना त्यामध्ये अधिक अचूकता असावी, म्हणून भारतीय हवामान खात्याने आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.मुंबईत वर्षभरात डॉप्लर रडार बसवण्याचे काम पूर्ण होईल.मुंबईत डॉपलर रडार बसवण्याची जागा निश्चित झाली असून येत्या एक वर्षात रडार बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे, या रडारमुळे ४०० किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज देणे शक्य होईल.

पावसावर सर्वाचे भवित्यव्य  अवलंबून असते.चागंला पाऊस पडणे हे सर्वाच्या गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण केले तरच चागंला पाउस पडेल.

No comments: