Thursday, April 14, 2011

गांधीटोपीचा प्रभाव

     गांधीटोपी ही स्वातंत्र्यसेनानींच्या नावाने वस्त्रांची ओळख होती.ही टोपी लढ्याचे,संघटित शक्तीचे,बलिदानाचे प्रतीक होती.खादीचा पांढरा स्वच्छ वेष आणि डोक्यावर गांधी टोपी असा राजकीय नेत्यांचा हा गणवेष राजधानीत कधीच इतिहासजमा झालाय.त्या वेषातील गांधीटोपी ने उठाव करुन ब्रिटीशांविरोधी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.त्या टोपीतील तिच ताकद आताच्या सरकारने चागंलीच अनुभवली आहे.

     ज्येष्ठ समाजसेवक, दुसरे गांधी अण्णा हजारे यांच्या ९६ तासांच्या उपोषणानतंर हि गांधीटोपी ला प्रसिद्धी मिळाली.'हम है अन्ना', 'सच का दुसरा नाम अन्ना', 'बोले तो अन्ना', 'दुसरा गांधी अण्णा' अशी घोषवाक्यं लिहिलेल्या गांधीटोप्या झपाट्याने दिसू लागल्या.देशातील जनतेनी ६० वर्षानतंर  पुन्हा देशानी या गांधीटोपीला स्विकारले आहे.

     महात्मा गांधींच्या जयंती आणि पुण्यतिथीला डोक्यावर गांधी टोपी चढवून बाकी वर्षाचे ३६३ दिवस लोकांना टोप्या घालण्याचा खेळ काँग्रेसजन नित्यनेमाने करत आले आहेत. अर्थात असा खेळ काही फक्त काँग्रेसजनांनाच खेळता येतो, असे नाही. या खेळात सर्वपक्षीय राजकारणी कसे तरबेज असतात, ते स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत आपण सर्वांनीच वारंवार अनुभवले आहे.

     गांधी टोपी, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अनुयायांची पहिली ओळख. पूर्वी जो गांधीवादी, त्याच्या डोक्‍यावर गांधी टोपी असायचीच. काळ बदलला आणि गांधी टोपी ही सत्ताकारण्यांची निशाणी बनली. अगदी गेल्या वर्षीपर्यंत, निदान गांधी जयंतीला तरी डोक्‍यावर गांधी टोपी घातलेले कॉंग्रेसचे नेते दिसत असत. यंदा मात्र गांधीजींना अभिवादन करणा-या अनेक कॉंग्रेसी नेत्यांची मस्तके टोपीविनाच दिसली अन्‌ गांधी टोपी आता कालबाह्य झाली असल्याची भावना जागी झाली.

       गांधी टोपी असावीच असा कोणताही लिखित नियम नसला तरी गांधीवादाचे ते एक प्रतीक मानले जाते. आधुनिक युगात गांधी टोपी परिधान करणा-या व्यक्‍ती तशा अभावानेच आढळतात. तरीही मंत्रालयात बहुतांश मंत्री, आमदार, खासदार यांच्या डोक्‍यावरील गांधीटोपी गेल्या काही वर्षांपर्यंत कायम होती. राजकारणात तरुणांची संख्या वाढल्यानंतर किमान गांधी जयंतीच्या दिवशी तरी डोक्‍यावर गांधी टोपी घालून राष्ट्रपित्याला अभिवादन करण्याची परंपरा कॉंग्रेसमध्ये होती; मात्र तरुणांचे राजकारण अशी परिभाषा रूढ होत असताना तरुणांचाच पेहराव आणि तरुणांसारखाच रुबाब असणे ओघानेच आले. आज याचेच दर्शन घडले. तरुण नेत्यांच्या राहणीमानातील बदल नैसर्गिक असला तरी राजकारणातल्या जुन्या जाणत्या पुढा-यांचीही वेशभूषा बदलल्याचे,त्यांनीही गांधी टोपीला तिलांजली दिल्याचे दिसत आहे.

        कॉंग्रेसच्या नेत्यांत किमान गांधी जयंतीच्या दिवशी तरी गांधी टोपी घालण्याचा अलिखित संकेत परंपरेने पाळला जात असे.यंदा मात्र सर्वच कॉंग्रेसी नेत्यांना गांधी टोपीचा विसर पडल्याचे दिसले. एकीकडे गांधीवादाला नवी झळाळी मिळत असताना, गांधी टोपी मात्र हद्दपार झाल्याचे दिसत आहे.कालमहिमा याशिवाय या बदलाचे अन्य उत्तर नाही.

    गांधीटोपीने सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधीच्या चागंल्या कार्याला जनतेनेही पाठिंबा केला पाहिजे.पाहुया, गांधीटोपी राजकीय नेत्यांमध्ये कोणते परिवर्तन करते?

No comments: