माँर्नीग़ वाँकला जातो तेव्हा हल्ली रोज़ आकाशात पक्षांची रांग उडताना दिसते.समोरुन वीस एक पक्षी एकत्र एकाच आडव्या रांगेत उडत उडत डोक़्यावरुन जातात.थोड्या वेळाने दुसरी रांग उडत येताना दिसते.जसे काय आँफिसलाच मर्स्टर पकडायला जात आहेत असे वाटते.हे पक्षी एकाच लयीत तंरगत उडत पुढे जाताना दिसतात.या पक्षाना उडत जाताना पाहायला खुप आनंद वाटतो.मी चक्क लहान मुलासारखे ती रांग डोक़्यावरुन पुढे सरकता पाहत राहतो.ही पक्षांची रांग म्हणजे एक समुद्रातील लाट वाटते.हळुहळु पुढे पुढे येत ती आपल्या डोक़्यावरुन जाते. या रांगेचा आकार त्या पक्षांच्या उडण्याच्या वेगाप्रमाणे वेगवेगळा राहतो.कधी विमानाचा,कधी पतंगाचा,कधी इंग्रजी अक्षर 'V','W','C' तर कधी सरळ रेषेत उडतात.एखादा सवंगडी पाठीमागे राहिला तर त्याला पुढे येण्यासाठी रांगेतले इतरजण वेग कमी करतात वाटते. ती एक रांग म्हणजे एक मोठे कुटुंब वाटते. कुटुंबप्रमुख पुढे असतो व त्याच्या पाठीमागे सर्व थोड्या थोड्या अतंरावर एका लयीत उडत विहार करीत असतात.हेच पक्षी संध्याक़ाळी सुर्यास्त होण्याअगोदर असेच रांगेतच उडत घरट्यात परततात.
एक नयनरम्य चित्र आपल्या नजरेसमोरुन जाताना दिसते. चित्रकार देखाव्याच्या चित्राला जिवंतपणा आणण्यासाठी या पक्षांच्या रांगेचा उपयोग करतो.उगवत्या सुर्याच्या दिशेने जात असलेल्या रांगेला पाहिल्यास सुंदरता आणखी वाढते.सुर्योदयाच्या वेळेला उधळलेल्या रंगात ही पक्षांची रांग पुढे जात असताना लहान होत होत नतंर दिसेनाशी होते.
वसंत ऋतु आल्यावर नटलेल्या निर्सगासाठी लांबचा प्रवास करीत खुपसे पाहुणे पक्षी आपल्या देशात येतात.या पक्षांच्या माळीचे स्वरुप पाहुन आपल्यालाही असा विहार करता आला असता कि आनंद घेता आला असता.

ह्या पक्षांची रांग पाहुन लहानपणीची आठवण आली.लहानपणी ह्या पक्षांच्या आकारावर आम्ही खेळ खेळायचो. प्रत्येकजण हे पक्षी आता कोणता आकार करतील हे अगोदर सांगायचे ,तो आकार झाल्यावर त्याच्या नावांने ओरडायचो.त्यावेळेला असे वाटायचे की हे पक्षी आमचे एकायचे व त्याप्रमाणे आकार बदलायचे.खुप मजा यायची. त्याच्याशी आम्ही जवळीक साधली होती. संध्याक़ाळी आम्ही त्या पक्षांची वाट पाहायचो.
वसंत ऋतु आल्यावर नटलेल्या निर्सगासाठी लांबचा प्रवास करीत खुपसे पाहुणे पक्षी आपल्या देशात येतात.या पक्षांच्या माळीचे स्वरुप पाहुन आपल्यालाही असा विहार करता आला असता कि आनंद घेता आला असता.
No comments:
Post a Comment