Saturday, April 9, 2011

'क्रिकेट डिप्लोमसी'मुळे सुटका

विश्वचषक,घोटाळे,आयपीएल व अण्णाचे उपोषण या गडबडीत गोपाल दास या भारतीय नागरिकाची पाकिस्तानातून सुटक़ा झाल्याची बातमी वाचण्यात आली.

हेरगीरीच्या आरोपाखाली गोपाल दास या भारतीय नागरिकाला १९८४ मध्ये पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले होते. भारत-पाक बॉर्डरपरिसरात राहणारे गोपाल दास नजर चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. यानंतर त्यांच्यावर तेथे खटला चालविण्यात आला.

जून १९८७ साली या खटल्याचा निर्णय आला आणि त्यांना जन्मठेप ठोठावण्यात आली. तेव्हापासून गेली २७ वर्षे तो पाकच्या तुरुंगात होता. तेथील नियमांनुसार या वर्षाच्या अखेरिस त्याची सुटका होणे अपेक्षित होते.पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाबाबात व्यक्त होण्यासाठी आमच्याकडे शब्दच नसल्याचे दास यांचे भाऊ अनंतर वीर यांनी सांगितले. पाकिस्तानातील अनेक कैदी भारतात परतले. प्रत्येक वेळी गोपाल येईल अशी आशा वाटायची आणि निराशा व्हायची.नेहेमीच अशी भावना त्यांच्या कुटुंबीयांची होत होती. 

'क्रिकेट डिप्लोमसी' चा मुहूर्त साधत पाक अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी मोहालीतील भारत-पाक र्वल्डकप सेमीफायनल आधी गोपाल यांच्या मुक्ततेचे आदेश दिले होते.त्यानतंर तारुण्याची तब्बल सत्तावीस वर्षे पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडल्यानंतर बावन्न वर्षांचे गोपाल दास गुरुवारी मायदेशात परतले.लाहोर तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर मायभूमीवर पाऊल ठेवताच अश्रू अनावर झालेल्या दास यांनी जमिनीवर माथा टेकवत मातीचे चुंबन घेतले.

गोपाल दास यांचे स्वागत करण्यासाठी वाघा सीमेवर त्यांचे कुटुंब आणि गावकरी उपस्थित होते. पाकिस्तानी तुरुंगात अनेक भारतीय कैदी खितपत पडले असून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय शिक्षा पूर्ण झालेले ३२ भारतीय कैदीही तुरुंगातून सुटकेच्या आशेवर जगत आहेत. मात्र भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न करत नसल्याचे सांगत दास यांनी त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पाक बॉर्डरपरिसरात राहणारे गोपाल दास नजर चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्याच्या चुकीसाठी त्याना २७ वर्षे शिक्षा परराज्यात भोगली. तेवढीच शिक्षा त्याच्या कुटुंबालाही भोगावी लागली.सुरुवातीला श्री.दासना कधीच वाटले नसेल कि मी मायदेशात परत जाऊ शाकेल.कुटुंबाच्या प्रयत्नाना यश २७ वर्षानी मिळाले आहे.सुटका झाल्यानतंर श्री दासानी मायदेशात जेव्हा प्रथम पाऊल ठेवले तेव्हा कसे वाटले असेल.पाकिस्तान सारख्या शत्रुच्या राज्यातून श्री.दास घरी येतील असे त्यांच्या कुटुंबीयांना कधीच वाटले नव्ह्ते.अशक्य कोटीतील ही घटना घडली आहे याचा आपल्यालाही आनंद आहे. 


विश्वचषकातील स्पर्घेतील 'क्रिकेट डिप्लोमसी'चा फायदा श्री.दास ना झाला.असेच आणखी जे कैदी शिक्षा भोगून पाकिस्तानात खितपत पडेल आहेत व त्यांचे कुटुंबीय वाट पाहत आहेत त्यांचीही सुटका करुन द्यावी द्यावी अशी विनंती सरकारला सर्वानी  करावी.

  


 

No comments: