Thursday, April 7, 2011

संस्कृती बदलत आहे.

        भारताने विश्वचषक जिंकल्यावर भारतवाशीयांनी जो जल्लोष थक्क करणार होता.जनता बेफाम झाल्याने  आनंदाला   उधान आले होते.  रात्रभर क्रिकेटप्रेमी  रस्यावर धमाल केली.  लोकांनी हा  आनंद वेगवेगळ्या  प्रकारे साजरा केला. 

     त्या मुंबईच्या आनंदत्सवात मद्यसंस्कृतीचा अंमल वाढला होता. विक्रमी  दारूविक्रीचे जे तडाखेबंद आकडे प्रकाशित झाले आहेत.होळीच्या दोन दिवसांत मुंबईकरांनी साडेतीन लाख लिटर दारू रिचवली. नववर्षाचे स्वागत करताना चार लाख लिटर संपवली. मात्र, हे विक्रम मोडून उपांत्य आणि अंतिम विजयाचा जल्लोष करताना मुंबईकरांनी सहा लाख लिटर दारू फस्त केली. हीच स्थिती राज्यातल्या बहुतेक शहरांत आणि देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथून येणा-या बातम्या हेच सांगत आहेत. 

     आनंद साजरा करण्याची पध्दत बदलत चालली आहे.शाँपेन फोडुन ती मित्रमडंळीसह रीचवून आनंद साजरा केण्याची  पश्चात संस्कृतीचे अनुकरण करु लागलो होतोत.आनंद किंवा सेलिब्रेशनचा दारूशी अन्योन्य संबंध जोडला आहे. दारुशिवाय आनंद साजरा केला जात नाही आणि जी मडंळी दारुकामात भाग घेत नाहीत त्यानी आनंदोत्सव साजरा केलाच नाही असे समजले जाते.

    तरुणपिढी आणि नशा हे समीकरण झाले आहे.सुखाच्या व दु:खाच्या प्रसंगाला नशा करुन साजरा केला जातो.
नवे जन्म किंवा अकस्मात मरण,वाढदिवस किंवा लग्न,मिरवणुक किंवा निवडणुक,पास किंवा नापास,पिकनिक किंवा संमेलन,वर्षाचा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस असो नशा केलीच पाहिजे.दारु पिणे ही एक फँशन झाली आहे.आपली संस्कृती सोडुन पाश्चात संस्कृती स्विकारलीच पाहिजे का? आपल्या सार्‍याच परंपरा कशा अमृतामय आहेत. त्या सोडून हे पाश्‍चात्त्य विष का बरं प्यायचे?

   अनंत व्यसनात बुडालेली आजची तरुणपिढी म्हणजे एक गंभीर समस्याच होऊन बसली आहे. माणसाला विकृतीकडे ढकलणारी पाश्‍चात्त्य संस्कृती आपण सर्वांनी अंगीकारली, त्याचेच भीषण परिणाम आज आपल्याला पदोपदी दिसतात.पाश्‍चात्त्य संगीत, पाश्‍चात्त्य नृत्ये आणि दारूचा महापूर आलेला दिसतो. काही ठिकाणी अमली पदार्थांचेही सेवन हमखास होते. आजच्या तरुणपिढीला अशा नृत्यरजनींचे खूपच ‘फॅड’ लागलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रात्रभर दारू पिऊन तर्र झालेले हे युवक कित्येक अपघातांना बळी पडतात.तरुणपिढी राजरोसपणे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून येते.नैराश्य, मनावरील दडपण, अतिताण, दु:ख यामुळे ते व्यसनांना बळी पडत आहेत.

तरुणांमध्ये ड्रग्ज घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. चांगल्या घरातील, सुशिक्षित आणि समंजस मुलेही ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली दिसत आहेत. यामागे एकच कारण आहे. काळ्या पैशाची किक्. काळा पैसा घरात आला की, पैसेवाल्या बडे बाप के बेट्यांना या व्यसनाच्या सवयी लागतात. खरा ड्रग्जचा विळखा हा पब, डिस्कोथेक येथेच पाहावयास मिळतो. सर्वच वर्गात ही समस्या वाढत आहे. कुणी टेंशनच्या नावाखाली, कुणी पैशाच्या मस्तीच्या जोरावर या विळख्यात सापडत आहे. पण या नशेला खरी किक् काळ्या पैशाचीच आहे. व्यसनांच्या कारणांची भली मोठी लिस्ट असली तरी कौटुंबिक संस्काराच्या अपूर्ततेमुळे अशा घडामोडी होत आहेत.

भारताला महासत्ता व्हायचे असेल तर तरुणपिढी व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे.आपली संस्कृती जपली पाहिजे.

No comments: