ऐतिहासिक... अविस्मरणीय... लाजवाब... येस, स्वप्न साकार झालं, भारतभूमीतील १२१ कोटी जनतेचं... टीम इंडियाचं आणि क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचंही!
हा माझ्या आयुष्यातला सर्वोच्च अभिमानाचा क्षण आहे. यापेक्षा अधिक अपेक्षाच नाही. हे अल्टिमेट यश आहे. सुंदर कामगिरी आणि सातत्यपूर्ण खेळाबद्दल सहकाऱ्यांचे आभार. ढोणीने सिक्सर तडकावला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू दाटले... पण हरकत नाही... ते आनंदाश्रू होते...! - सचिन तेंडुलकर
'गेली २१ वर्षं 'तो' देशाचं, देशवासियांच्या अपेक्षांचं-भावनांचं ओझं त्याच्या खांद्यावर समर्थपणे पेलतोय... त्यामुळे आता या क्षणी त्याला खांद्यावर उचलणं हे आमचं कर्तव्यच आहे...' टीम इंडियातील सगळ्यात तरुण वीर विराट कोहलीचे हे उद्गार ऐकून तमाम देशवासियांच्या अंगावर नक्कीच शहारा आला असेल.
वर्ल्ड कपमध्ये मी ज्या ‘ मॅच विनिंग इनिंग ’खेळी खेळलो त्या माझ्या कुठल्या गर्लफ्रेंडसाठी वगैरे नव्हता, तर त्या खास सचिनसाठीच होत्या, असं युवीनं जाहीर केलं युवराज सिंह
विजयाचं सर्व श्रेय सचिन तेंडुलकरला आहे, आम्ही त्याच्यासाठीच खेळलो, ऑस्ट्रेलिया- पाकिस्तानला हरवल्यानंतर आमचं विजयाचं स्वप्नपूर्ण झालंय, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली म्हणून आमचा विजय अर्पण - गौतम गंभीर
मी यावेळी अनेक महत्वाचे बदल केले, याची मला उत्तरं द्यावी लागतील, अश्विन ऐवजी श्रीशांतला का खेळवलं? युवराजच्या ऐवजी बॅटिंगला मीच का आलो? अशा प्रश्नांची मला उत्तरं द्यावं लागतील, संघातील तरूण खेळाडूंवरील ताण कमी करण्यासाठी मी आधी खेळायला आलो. सामन्यातील महत्वाच्या क्षणी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी संयमी खेळी केली- महेंद्रसिंह धोनी
महेन्द्रसिंग धोनीचा लाँग ऑनला षटकार ठोकला आणि वानखेडे स्टेडियमच नाही, तर अख्खा भारत देश विजयाच्या जल्लोषात बुडून गेला.
रफ अँड टफ युवराज सिंगही आनंदानं रडू लागला, पराभवाचे अश्रू आवरत कुमार संगकारानं धोनीचं अभिनंदन केलं. अख्खी भारतीय टीम सेलिब्रेशनसाठी मैदानात उतरली.
भारत पुन्हा एकदा वन डे क्रिकेटच्या सिंहासनावर आऱूढ झालाय.
१९८३मध्ये कपिल्स डेव्हिल्सनी क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर विश्वविजय साजरा केला होता. शनिवारी मुंबईत, भारतीय क्रिकेटच्या पंढरीत धोनी ब्रिगेडनं इतिहास रचला..सचिनसाठी वर्ल्ड कप जिंकणं, हेच ढोणीसेनेचं ध्येय होतं, त्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं आणि विश्वविक्रमादित्यासाठी पराक्रम केला, असंच म्हणावं लागेल.
आजवर १९८३च्या विश्वविजयाच्या अनेक कहाण्या ऐकल्या होत्या. त्या ऐकतच मी मोठी झाले. आता सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आमच्याही पिढीकडे आहेत. अभिनव बिन्द्राचं गोल्ड मेडल असो, सायना नेहवाल असो, पेस-भूपती-सानिया-सोमदेव असोत किंवा विश्वनाथन आनंद.. सगळ्यांच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. पण धोनी ब्रिगेडचा विजय त्याहीपेक्षा मोठा ठरलाय.
शनिवारी त्या गर्दीलाही तिरंग्याचा रंग चढला होता. पहाट होत आली तरी रस्त्या-रस्त्यावर, गल्ली-गल्लीत तिरंगा फडकत होता, व्हिक्टरी रॅलीज सुरू होत्या.
पण अख्ख्या देशाला वेड लावण्यापेक्षाही धोनी ब्रिगेडनं साधली आहे एक अशक्य गोष्ट. टीम इंडियानं आम्हाला जाणीव करून दिलीय, आमच्यातल्या ताकदीची आणि हिंमतीची. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही गोष्ट मिळवता येते याची.
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताच्या विजयासोबतच उत्सुकता होती ती सचिनच्या महाशतकाची - अर्थात शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाची.सचिन निराश अवस्थेत पॅव्हेलियनमध्ये परतला होता आणि त्याच वेळी 'वानखेडे'सह सगळा देश, एवढेच नव्हे; तर हा सामना पाहणारे जगभरचे भारतीय क्रिकेटप्रेमी जणू मूक झाले होते. ती भयावह स्तब्धता सांगत होती
टीम इंडियाच्या एका विजयानं एकशेवीस कोटी लोकांना नवी उमेद मिळालीय.
1 comment:
Very very nice article. Thanks : AA
Post a Comment