स्विस बँकेमध्ये सर्वात जास्त खाती भारतीयांची आहेत. ही महत्त्वाची बातमीचा विकिलीक्सने जाहीर केली आहे.भारतात भ्रष्टाचार फोफावल्याने स्विस बँकेत वेगात जामा होत आहे.परदेशातून येणा-या पैशात सर्वात जास्त पैसा भारतातून जमा होत आहे.जमा होणा-या या काळ्या पैशाबाबत भारतीय सरकार कारवाई करत नसल्याने खुल्लेआम पैसा जमा केला जात आहे.'स्विस बँक' म्हणजे गोपनियतेच्या नावाखाली चोरांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण आहे.ते आपल्या चोर ग्राहकांचे हितसंबध बघणारच, त्यात काय विशेष? देशात भ्रष्टाचा-यांचे पिक वाढत असल्याने ते सर्व मिळुन जमवलेला पैसा सुरक्षित राहण्यासाठी परदेशातील बँकेत ठेवत आहेत देशातील जनतेला कळले आहे.हा पैसा स्विस बँकेत कोणत्या मार्गाने जातो याचाही शोध भारत सरकारने घेतला पाहिजे.स्विस बँकेमधील खातीधारकांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये कित्येक भारतीयांची नावे होती. यापुढे जी माहिती प्रसिद्ध करण्यात येईल त्यामध्ये आणखी काही भारतीयांची नावे येण्याची शक्यता आहे.प्रायव्हेट स्विस बँकेमध्ये खाते असणे ही एक मोठी पँशन आहे. येथे खाते उघडण्यासाठी लाखो डॉलर्सची आवश्यकता असता त्यामुळे अर्थात हे खातेदार सामान्य भारतीय नागरिक नाहीत हे उघड होत आहे.
भारतीयांच्या परदेशी बँकेतील खात्यांचा तपशील केंद सरकारला मिळाला असला तरी, तो जाहीर न करण्याचा आंतरराष्ट्रीय करार संबंधित देशांशी झालेला असल्याने तो पाळणे बंधनकारक आहे, अन्यथा बँक खात्यांची अधिक माहिती मिळणे थांबेल', असे मनमोहन सिंग तसेच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काही दिवसापुर्वी स्पष्ट करून केंदांची भूमिका विशद केली होती.याचा अर्थ सरकारला ह्या गोष्टीची माहीती आहे.स्विस बँकेतील काळ्या पैशांची माहिती केंद सरकार जाणीवपूर्वक लपवत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
स्विस बँकेत सर्वाधिक पैसा भारतीयांचा असूनही या बाबतीत सरकार थंड बसून आहे. भारतीय सरकारला या बाबतीत काहीतरी कारवाई करणे जरूरी आहे कारण यात भारतीयांच्या टॅक्सचे नुकसान होत आहे. ते पुढे म्हणाले की जर आपला काळा पैसा आपल्या देशामध्ये राहिला तर तो तेथेच खर्च होतो आणि यामुळे कोणत्या न कोणत्या स्वरुपात फायदा होतो. पण जर काळा पैसा परदेशामध्ये जमा केला गेला तर ज्या देशात तो जमा केला आहे त्या देशाला त्याचा फायदा होतो. यामुळे आपल्या सरकारने या बाबतीत आक्रमक धोरण राबवण्याची गरज आहे.
भारतातून स्विस बँकेत जो (ही जनतेची लूट) पैसा जामा केला जातो तो जनतेचा पैसा परत देशात आणल्यास सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र होतील.नाहीतर आपला पैसा देशात आणण्यासाठी जनतेलाच आंदोलन करावे लागेल.
1 comment:
खूप आवडला तुमचा ब्लॉग.
Post a Comment