Thursday, April 28, 2011

चप्पलफेकीचा प्रसाद

चप्पल फेकून मारणे हे राग अनावर झाल्यावर व असंतोषाला वाट करून देण्याच्या हा नविन प्रकार वाढत आहे.सगळीकडुन निराशा हातात आल्याने असंतोष व्य्क्त करण्यासाठी चप्पल व बूट मारण्याचे  एक हत्यार बनले आहे. नेत्यांवर सुरू असलेली चप्पलफेक हा जागतिक चचेर्चा विषय बनला आहे.

राजकीय नेत्यांवर बूट फेकण्याचे इराकी पत्रकाराने सुरू केलेले सत्र भारतातही सुरु होउन आतापर्यत अशा घटना पाठोपाठ घडत आहेत.

भारतीय समाजात कुणाला पादत्राणे फेकून मारणे सभ्यतेचे लक्षण मानले जात नसले तरी अलीकडे देशातील राजकारणात अग्रस्थानी  असणा-या आणि समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्वांना बूट,चपलांचा प्रसाद देण्याचा कल दिवसेदिवस वाढत आहे.इराकमघ्ये मावळते राष्ट्राघ्यक्ष जाँर्ज डब्ल्यु बुश यांच्या पत्रपरिषदेत त्यांच्यावर बूट फेकण्यांची घटना प्रथमच संपूर्ण जगाने बधितली. 

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर ब्रिटनमध्ये आज एका अज्ञात व्यक्तीनं आपले बूट फेकले. बर्मिंगहॅम इथल्या सभेत अचानक घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक् झाले होते.

राजकीय नेत्यांवर चप्पलफेक करून संतापाला वाट करून देण्याच्या प्रवृत्तीचा फटका इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना आयर्लंडमधील डब्लिन येथे बसला. आपल्या आत्मचरित्रावर स्वाक्षरी देण्याच्या कार्यक्रमासाठी ब्लेअर येताच युद्धविरोधी आंदोलकांनी त्यांच्यावर अंडी, चप्पल भिरकावल्या होत्या.


८४च्या शीखविरोधी दंगलीत काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्यामुळे नाराज शीख पत्रकाराने चिदंबरम यांच्यावर बूटफेक केली होती. त्याचेच अनुकरण करत एका निवृत्त प्राचार्याने कुरुक्षेत्रचे काँग्रेस उमेदवार नवीन जिंदाल यांच्यावर चप्पलफेक केली होती.


भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यावरहि चप्पलफेक झाली होती.

चप्पलफेक टाळण्यासाठी ज्यांच्या पायात बूट आहेत.अशा विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांची भेट दिली होती. परिस्थिती बिकट असल्यामुळे बूट खरेदी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या भेटीपासून वंचीत राहावे लागले होते.

कलमाडी यांना सुनावणीसाठी पतियाळा हाऊस कोर्ट येथे आणले जात असताना कपिल ठाकूर नावाच्या व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली होती. मात्र पोलिसांच्या गराड्यात असलेल्या कलमाडींपर्यंत ती पोहचू शकली नाही. कपिलला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले होते.

देशभरात  राजकारण्यांबाबत  जनतेत    असलेल्या प्रचंड असंतोष    कारणीभूत असला    तरी चप्पलफोकीच्या
घटनांना  प्रसारमाध्यमांनी    दिलेली अवास्तव    प्रसिध्दिही    तितकीच जबाबदार    आहे  .देशात घडलेल्या या
घटनांमुळे प्रसिध्दीची ललसा असणा-याना चप्पलफेकी करुन लोकप्रिय होण्याचा   'नवा फंडा'  च गवसला आहे.
त्यामुळे येत्या काळात हा असभ्य प्रकार वाढत जाणार आहेत.राजकारण्यांना चप्पलांचा प्रसाद टाळायचा असेल
तर त्यांना एकतर सभाना,पत्रपरिषदांना येताना चप्पल व बुट बाहेर काढायला भाग पाडावे लागेल अशी विनंती
करावी लागेल.

चप्पल फेकणे हि क्रिया केवळ त्यांच्यातील खदखदणारा असंतोष व्यक्त करीत नसून,ज्या मुद्दयांकडे ते सातत्याने दुर्लक्ष करीत  आहेत,त्याकडे लक्ष वेधण्याचा मुख्य हेतु असतो.


चप्पलफेकीचा प्रसाद मोठ्या मोठ्या नेत्याना मिळाला आहे.

No comments: